ट्विटरचे मालक एलोन मस्क यांनी त्यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI लॉन्च केली आहे. याबाबत ते म्हणाले की, याद्वारे आपण विश्वाचे खरे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की xAI च्या टीमचे नेतृत्व एलोन मस्क करणार आहे आणि त्यांच्या कर्मचार्यांमध्ये Google, Microsoft, DeepMind आणि इतरांसह कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये यापूर्वी काम केलेले अधिकारी समाविष्ट आहेत. एलोन मस्क यांनी बुधवारी केलेली ही घोषणा ChatGPT सारख्या AI तंत्रज्ञानाला आव्हान देणारी घोषणा असल्याचे मानले जात आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, मस्क आणि त्यांची टीम शुक्रवारी, 14 जुलै रोजी थेट ट्विटर स्पेस चॅटमध्ये ही माहिती जगासोबत शेअर करतील. याआधी एलोन मस्क 2015 मध्ये OpenAI चे सह-संस्थापक होते. मात्र, टेस्लासोबत हितसंबंधांचा संघर्ष टाळण्यासाठी 2018 मध्ये त्यांनी पद सोडले. (हेही वाचा: Made by Tata iPhones: लवकरच बाजारात येणार टाटा कंपनीचे आयफोन; ठरणार असा पहिला भारतीय ब्रँड, Wistron कंपनीशी करार अंतिम टप्प्यात)
Excited to help advise on AI safety https://t.co/zxbIExFo56
— Dan Hendrycks (@DanHendrycks) July 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)