सावधान! तुम्ही जर 'हे' पासवर्ड ठेवले असाल तर त्वरीत बदला
तर सायबरने (Cyber) शोधून काढलेल्या या माहितीमध्ये 123456 हे क्रमांक असलेले पासवर्ड (PassWord) जास्त हॅक (Hacked) करण्यात आले आहेत.
यंदाच्या चालू वर्षात 2018 मध्ये हॅक झालेल्या पासवर्डच्या यादीचा खुलासा करण्यात आला आहे. तर सायबरने (Cyber) शोधून काढलेल्या या माहितीमध्ये 123456 हे क्रमांक असलेले पासवर्ड (Password) जास्त हॅक (Hacked) करण्यात आले आहेत. तसेच Password हा शब्द हॅकच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सायबर सिक्युरिटी रिसर्च हे सातत्याने नागरिकांना पासवर्ड संबंधित सावधानतेचा इशारा देत असतात. तसेच सध्या लोक आपल्या मोबाईल, लॅपटॉप आणि ई-मेल यांसारख्या गोष्टींसाठी पासवर्ड ठेवतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची माहिती पासवर्डच्या आधारे गुप्त राहण्यास मदत होते.तर सायबरने जाहीर केलेल्या यादीमध्ये 50 लाख अकाऊंट यांचा समावेश आहे. तर पासवर्ड हॅक होण्याचे हे लगातार पाचव वर्ष आहे.
या पासवर्डच्या यादीमध्ये 123456789 हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर 12345678 पाचव्या आणि 12345 सहाव्या क्रमांकावर आहे.तर सर्वात खराब पासवर्डच्या यादीत sunshine, qwerty, iloveyou, princess, admin, welcome, 666666, abc123, football, 123123, monkey, 654321, !@#$%^&*, charlie, aa123456, donald, password1 आणि qwerty123 यांचा समावेश आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी सावधानीचा इशारा बाळगण्याचा इशारा दिला आहे.