Wipro Offers Salary Hike to Employees: विप्रोत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 8% पगारवाढीची ऑफर; मार्च 2025 पर्यंत 10,000 जागांच्या नोकरभरतीची शक्यता
त्याशिवाय, मार्च 2025 पर्यंत 10,000 पदवीधरांसह नोकर भरती वाढवण्याची योजना आखत आहे.
Offers Salary Hike to Employees: विप्रोने सप्टेंबर 2024 पासून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीची घोषणा(Wipro Salary Hike) केली आहे. अहवालानुसार, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विप्रो सरासरी 8 टक्के पगारवाढ जाहीर करण्याची अपेक्षा आहे. आर्थिक अनिश्चिततेमुळे इतर आयटी कंपनी खर्च कमी करत असताना विप्रोने असा विचार केला असल्याने विप्रो कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे. त्याशिवाय, कंपनीने मार्च 2025 पर्यंत 10,000 पदवीधरांसह नोकर भरती(Wipro Hiring)वाढवण्याची योजना आखत आहे. (हेही वाचा: BMW Sales Increased In India:2024 च्या पहिल्या सहामाहीत BMW Group India ची भारतात आतापर्यंतची सर्वाधिक कमाई; 7,098 युनिट्सची विक्री)
मिंटच्या अहवालानुसार, विप्रो यावर्षी आपल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सरासरी 8 टक्के पगारवाढ देत आहे. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) नंतर पगार वाढ जाहीर करणारी विप्रो ही दुसरी मोठी भारतीय आयटी कंपनी ठरली आहे. पगारवाढ विप्रोच्या 2,00,000 ऑफशोअर कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 75 टक्के कर्मचाऱ्यांना लागू होईल.
एकीकडे विप्रो आणि टीसीएसने कर्मचाऱ्यांच्या पागारात वाढ जाहीर केली आहे. परंतु इन्फोसिस आणि एचसीएल टेक सारख्या इतर मोठ्या आयटी कंपन्यांनी अद्याप त्यांच्या योजना जाहीर केल्या नाहीत. मायक्रोसॉफ्ट ब्लॅकरॉक डेटा सेंटर्स आणि एनर्जी प्रोजेक्ट्ससाठी USD 30 अब्ज एआय इन्व्हेस्टमेंट फंड लाँच करणार आहेत.
श्रीनिवास पलिया यांनी एप्रिल 2024 मध्ये विप्रोत CEO म्हणून पदभार स्वीकारला. विप्रोचे मुख्य एचआर सौरभ गोविल यांनी कर्मचाऱ्यांना सूचित केले आहे की ही पगारवाढ कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबरच्या वेतनात समाविष्ट केली जाईल. यात सप्टेंबरची राहिलेली थकबाकी देखील समाविष्ट केली जाईल जेणेकरून कर्मचाऱ्यांना आवश्यक समायोजन मिळेल.