IPL Auction 2025 Live

WhatsApp चे नवे finger Print फिचर; चॅट, डेटा राहील अधिक सुरक्षित

लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी वारंवार नवनवे फिचर्स सादर करत असतं.

WhatsApp fingerprint authentication (Photo Credits: Pixabay)

WhatsApp Fingerprint Authentication:  लोकप्रिय मेसेजिंग अॅप (Messaging App) व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या युजर्ससाठी वारंवार नवनवे फिचर्स सादर करत असतं. आता युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन व्हॉट्सअॅप लवकरच नवे फिचर सादर करत आहे. खास अॅनरॉईड युजर्ससाठी (Android users) व्हॉट्सअॅप फिंगरप्रिंट फिचर (finger Print Authentication) सुरु करत आहे. यामुळे फिंगरप्रिंटच्या आधारे तुम्ही व्हॉट्सअॅप लॉक करु शकता. अॅनरॉईड युजर्सची प्रायव्हसीची सुरक्षितता लक्षात घेऊन व्हॉट्सअॅप या नव्या टेक्निकवर काम करत आहे. WhatsApp Gold : Update नाही तर Virus, लिंकवर क्लिक करणं पडू शकत महागात

गुगल प्ले बेटा प्रोग्रॅमच्या माध्यमातून कंपनीने Android 2.19.3 अपडेट करत हे फिचर सादर करणार आहे. यामुळे तुम्ही फिंगरप्रिंटच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप ऑन ऑफ करु शकाल.

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, या फिचरवर सध्या व्हॉट्सअॅप काम करत आहे. यापूर्वी व्हॉट्सअॅप IOS वर 'फेस आयडी' आणि 'टच आयडी' सुविधा सुरु करण्यावर काम करत होतं. मात्र हे फिचर वापरता आणणं शक्य झालं नाही. Whatsapp घेऊन आलाय तीन नवे फीचर्स, चॅटिंग होणार गमतीशीर

या नव्या फिंगरप्रिंट फिचरसाठी व्हॉट्सअॅप आपल्या अॅपमध्ये एक नवे सेक्शन सुरु करेल. ज्यात युजर्सला फिंगरप्रिंट फिचर वापरण्याचा पर्याय देण्यात येईल. भविष्यात हे फिचर IOS अपडेट मध्येही उपलब्ध होईल. या नव्या फिचरमुळे युजर्सची प्रायव्हसी अधिकच सुरक्षित होईल.