मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी WhatsApp देणार वॉर्निंग, युजर्ससाठी नवे फिचर लवकरच रोलआउट करणार
यामध्ये एखादा व्यक्ती कोणताही मेसेज दुसऱ्याला पाठवण्यापूर्वी त्याला वॉर्निंग (Warning) दिली जाणार आहे.
जगप्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp) वर लवकरच एक नवे फिचर रोलआउट केले जाणार आहे. यामध्ये एखादा व्यक्ती कोणताही मेसेज दुसऱ्याला पाठवण्यापूर्वी त्याला वॉर्निंग (Warning) दिली जाणार आहे. व्हॉट्सअॅपने सांगितले की, एक नवे कॅम्पेन लॉन्च करणार आहे. त्याचे नाव Check It Before You Share असे असणार आहे. हे फिचर युजर्सला एका प्रकारे वॉर्निंग देणार असून एखाद्या मेसेज बाबत पुष्टी करण्यास विचार करायला लावणार आहे. कंपनी फेक न्यूजवर लगाम लावण्यासाठी हे पाऊल उचलत आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोशल मीडियात प्लॅटफॉर्मवर खोट्या बातम्या आणि माहिती वेगाने फैलावल्या जातात. व्हॉट्सअॅपचे असे म्हणणे आहे की, कॅम्पेनचा उद्देश एखाद्या मेसेज बाबत अधिक माहिती मिळवण्याची सवय लावणे आहे. कंपनीने असे ही स्पष्ट केले आहे की, युजर्सला एखादा मेसेज मिळाल्यावर किंवा फॉरवर्ड करण्यापूर्वी MyGov हेल्पलाईन किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून त्याची पुष्टी करुन घ्यावी.(Facebook चे नवे फिचर रोलआउट, एकाच वेळी 50 जणांसोबत व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून संवाद साधता येणार)