IPL Auction 2025 Live

WhatsApp ‘Together at Home’ Stickers: जागतिक आरोग्य संघटना सोबत व्हॉट्सअ‍ॅपने आणलेला हा नवा स्टीकर्स पॅक डाऊनलोड करून Quarantine Period मध्ये मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत कसा शेअर कराल?

इंग्रजी, हिंदी सोबत 11 विविध भारतीय भाषांमध्ये हा पॅक उपलब्ध आहे.

WhatsApp Together at Home Stickers (Photo Credits: WhatsApp)

कोरोना व्हायरसच्या जीवघेण्या आजारावर अद्याप कोणतेही औषध नसल्याने नागरिकांना सध्या कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 21 व्या शतकात धकाधकीच्या झालेल्या जीवनात नागरिकांना घरात राहणं अडकून पडल्यासारखं वाटत आहे. पण ती काळाची गरज असल्याने समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी आता जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp)  कडून खास ‘Together at Home’ स्टीकर्स पॅक लॉन्च करण्यात आला आहे. इंग्रजी, हिंदी सोबत 11 विविध भारतीय भाषांमध्ये हा पॅक उपलब्ध आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या स्टीकर पॅक मध्ये 21 नवे स्टीकर्स उपलब्ध आहेत. तर प्रत्येक स्टीकर वर घरी राहण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणारे काही मेसेज लिहलेले आहेत. “We’ll do this together” आणि “You’re my hero” अशा प्रकारचे मेसेज लिहलेले आहेत. यामध्ये हिंदी भाषेतील मजकूर असलेले देखील काही स्टीकर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅपच्या यापॅकमध्ये अरेबिक, फ्रेंच, जर्मन आणि इंडोनेशियन भाषेतीलही मेसेज आहेत.

Together at Home व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर पॅक कसा वापराल?

व्हॉट्सवर मध्ये स्टीकर सेक्शनवर क्लिक करा. टेक्स्ट बारवर स्टिकर आयकॉनवर क्लिक करून ‘+’वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हांला स्टिकर्स पॅकची यादी दिसेल. त्यामध्येच Together at Home stickers असतील. त्यानंतर खालच्या दिशेला बाण असलेल्यावर क्लिक करा. त्यानंतर चॅट बॉक्समध्ये जाऊन पहा. तुम्हांला नवा स्टीकर पॅक दिसायला लागेल.

2018 साली व्हॉट्सअ‍ॅपने स्टीकर्सची संकल्पना आणली आणि अल्पावधीतच ती लोकप्रियदेखील झाली. सणांप्रमाणे, विविध थीम प्रमाणे या अनेक भारतीय भाषांमध्येही आता व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स उपलब्ध आहेत. दरम्यान कोव्हिड 19 च्या जागतिक संकटामध्ये सामना करण्यासाठी आता व्हॉट्सअ‍ॅपनेही हातभार लावला आहे. फेक न्यूज टाळण्यासाठी सेटिंग्जमध्ये बदल केले जाणार आहेत.