WhatsApp ‘View Once’ फिचर Beta युजर्ससाठी लवकरच होणार उपलब्ध; पहा काय आहे खासियत

या फिचरद्वारे फोटोज, व्हिडिओज एकदा पाहिल्यानंतर आपोआप डिलिट होणार आहेत. अॅनरॉईड बिटा व्हर्जनसाठी हे फिचर असेल.

WhatsApp Logo (Photo Credits: Pixabay)

फेसबुकची (Facebook) मक्तेदारी असलेले व्हॉट्सअॅप (WhatsApp) आता एक नवे फिचर युजर्ससाठी घेऊन येणार आहे. या फिचरद्वारे फोटोज, व्हिडिओज एकदा पाहिल्यानंतर आपोआप डिलिट होणार आहेत. अॅनरॉईड बिटा टेस्टर्ससाठी (Android Beta Testers) हे फिचर असेल. व्हॉट्सअॅपवर लवकरच हे फिचर उपलब्ध होईल, अशी माहिती कंपनीचे प्रमुख Mark Zuckerberg आणि Will Cathcart यांनी दिली आहे. जेव्हा तुम्ही view once चा वापर करुन फोटोज आणि व्हिडिओज पाठवाल ते केवळ एकदाच पाहता येतील आणि समोरच्या व्यक्तीने फोटो किंवा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याचे नोटीफिकेशन तुम्हाला येईल.

read receipts म्हणजेच ब्लु टिक डिसेबल केले असेल तर view once सेट करुन पाठवलेले फोटोज किंवा व्हिडिओज समोरील व्यक्तीने पाहिले की नाही, हे तुम्हाला कळणार नाही. परंतु, तुम्हाला आलेले फोटोज किंवा व्हिडिओज तुम्ही पाहिलेत हे समोरील व्यक्तीस कळेल. (नवीन सूचनांमुळे WhatsApp चे कामकाज व वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीवर परिणाम होणार नाही; नागरिकांच्या Right of Privacy हक्काचा आदर करण्यास सरकार कटिबद्ध- Government of India)

फोटो किंवा व्हिडिओचा स्क्रीनशॉर्ट काढून समोरील व्यक्ती आपल्या फोनमध्ये सेव्ह करु शकतात. सध्या स्क्रीनशॉर्ट डिटेक्शन फिचर नसल्यामुळे तुम्हाला याबाबत व्हॉट्सअॅपकडून नोटीफिकेशन मिळणार नाही. त्याचबरोबर view once सेट करुन तुम्ही ग्रुपमध्ये देखील फोटोज आणि व्हिडिओज पाहू शकाल. तसंच ते कोणी पाहिलेत हे देखील तुम्हाला कळेल, अशी माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे.

view once फिचर अनेबल असलेल्या व्यक्तीला तुम्ही या फिचरचा वापर करुन फोटो किंवा व्हिडिओ पाठवले तरी देखील हे फिचर काम करेल आणि ते केवळ एकदाच तो फोटो किंवा व्हिडिओ पाहू शकतील. हे फिचर सर्व अॅनरॉईड बिटा टेस्टर्स साठी उपलब्ध असून लवकरच ते iOS बिटा टेस्टर्ससाठी देखील उपलब्ध केले जाईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif