व्हॉट्स अॅपकडून लवकरच 'डिलिट मेसेज' सुविधा; ठराविक वेळेत मॅसेज होणार गायब

अनेक युजर्स फेसबूकपेक्षा व्हॉट्स अॅपचा जास्त वापर करतात. त्यामुळे व्हॉट्स अॅप आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन फीचर्स विकसित करत असते. नुकतेच व्हॉट्स अॅपने 'डिलिट मेसेज' हे नवीन फीचर्स आणले आहे.

WhatsApp | (file photo)

भारतात व्हॉट्स अॅप (WhatsApp) वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक युजर्स फेसबूकपेक्षा व्हॉट्स अॅपचा जास्त वापर करतात. त्यामुळे व्हॉट्स अॅप आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन फीचर्स विकसित करत असते. नुकतेच व्हॉट्स अॅपने एक नवीन फीचर्स आणले आहे. सध्या व्हॉट्सऍपवर आलेला कोणताही संदेश युजर्सला स्वतःहून डिलिट करावा लागतो. मात्र, आता नव्या फीचरनुसार, युजर्सना ठरविलेल्या मुदतीनंतर त्याच्या व्हॉट्स अॅपवरील संदेश स्वतःहून गायब होणार आहेत. आता ही मुदत एक तास, एक दिवस, एक आठवडा, एक महिना किंवा एक वर्ष कोणतीही असू शकते. यासाठी युजर्सना मुदत ठरवायची आहे. युजर्सना ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपसाठी ही सुविधा सुरू करायची आहे, त्या ग्रुपसाठी वापरकर्त्याला सेटिंग करावी लागणार आहे. या सुविधेला 'डिलिट मेसेज', (Delete Messages) असे नाव देण्यात आले आहे. (हेही वाचा - व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी आणले 'हे' खास फीचर्स; जाणून घ्या)

व्हॉट्स अॅपच्या बिटा व्हर्जन 2.19.348 मध्ये अँड्राईड मोबाईलधारकांसाठी ही सुविधा उपलब्ध झाली आहे, अशी माहिती WABetaInfo ने दिली आहे. सध्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी किंवा बिटा वापरकर्त्यांसाठी ही सुविधा उपलब्ध नाही. सर्वसामान्य ग्राहकांनाही ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्हॉट्स अॅप प्रयत्न करत आहे. व्हॉट्स अॅपवरील या सुविधेमुळे दोघांमधील किंवा ग्रुपमधील चॅटिंग व्हॉट्स अॅप स्वतःहून डिलिट करणार आहे. यासाठी तुम्हाला केवळ वेळ सेट करावा लागणार आहे.

हेही वाचा - गुगलचा Pixel स्मार्टफोन हॅक करणाऱ्याला गुगल देणार 10 कोटी!

दरम्यान, 'डिलिट मेसेज' सुविधा ही नवीन नसून व्हॉट्स अॅपच्या स्पर्धक कंपन्या 'टेलिग्राम' आणि 'सिग्नल' यांनी याआधीच आपल्या ग्राहकांसाठी ही सुविधा दिली आहे. येत्या काळात व्हॉट्सअॅप युजर्सना अ‍ॅपवर आणखी काही महत्त्वाचे फीचर्स पाहायला मिळणार आहेत. यातील काही फीचर्स व्हॉट्सअॅपच्या अपडेटेड व्हर्जनवर उपलब्ध असणार आहेत. या फीचर्सचा लाभ घेण्यासाठी युजर्सना आपले व्हॉट्स अॅप अपडेट करावे लागणार आहे