WhatsApp Update : आता व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये प्रायव्हेट रिप्लाय करण्याची सोय !

व्हॉट्सअॅपवर बीटा व्हर्जनमध्ये सुरु करण्यात आला सुरु करण्यात आला प्रायव्हेट रिप्लाय करण्याचा पर्याय

व्हॉट्सअॅप फीचर्स photo credit : pixabay

आजकाल व्हॉट्स अॅप हे केवळ मेसेज पाठवण्यापुरता मर्यादित नाही. त्यामध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या अपडेट्समुळे युजर्सना नवनवीन फीचर्स मिळत आहेत. नुकतंच व्हॉट्सअॅपने इमोजी सोबतच जिफ इमेज आणि स्टिकर्स वापरण्यासाठी काही स्टिकर्स व्हाट्सअॅपमध्ये रोलआऊट केले आहेत. लवकरच ग्रुप चॅट मध्ये तुम्हांला प्रायव्हेट चॅटींगचा पर्याय मिळणार आहे, या पर्यायाद्वारा तुम्ही केवळ एका व्यक्तीला थेट रिप्लाय करू शकणार आहात. सध्या हा पर्याय केवळ . बीटा व्हर्जन वर सुरु करण्यात आला आहे.WhatsApp Update : लवकरच WhatsApp Status वर जाहिरात दिसणार

प्रायव्हेट रिप्लाय

व्हॉटसअॅपवर यूज़रला प्रायव्हेट रिप्लाय द्यायचा असल्यास तो मेसेज तुम्हांला होल्ड करावा लागणार आहे.

त्यानंतर उजवी कडील ३ डॉट असणाऱ्या मेन्यू मध्ये क्लिक करावं लागेल.

तेथेच तुम्हांला प्रायव्हेट रिप्लाय करण्याचा पर्याय मिळेल.

तो पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला एक नवी विंडो दिसेल. ज्यामध्ये प्रायव्हेट चॅट विंडो द्वारा तुम्ही उत्तर देऊ . शकणार आहात.

प्रायव्हेट चॅट हा पर्याय व्हाट्सअॅपच्या 2.18.335 या . व्हर्जनमध्ये दिसणार आहे.

वर्ष भरापूर्वी विंडोजच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप ने हे बीटा व्हर्जनमधील प्रायव्हेट चॅट चा पर्याय खुला केला होता. मात्र तो ताबडतोब काढूनही टाकण्यात आला . होता. आता पुन्हा व्हॉट्स ऍपकडून हा पर्याय मिळावा यासाठी अनेक युजर्सना प्रतीक्षा आहे. मात्र आताही हा पर्याय केवळ बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.