WhatsApp New Privacy Policy: व्हॉट्सॲपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसी बद्दल सरकारकडून विचार केला जात असल्याची रवि शंकर प्रसाद यांची माहिती
त्यात असे म्हटले गेले आहे की, भारतीय युजर्ससाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसी बद्दल मागे घेण्यास सांगितले आहे
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाकडून व्हॉट्सअॅपचे ग्लोबल सीईओ विल कॅथकार्ट यांना पत्र लिहिले आहे. त्यात असे म्हटले गेले आहे की, भारतीय युजर्ससाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसी बद्दल मागे घेण्यास सांगितले आहे. ANI यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीईओ यांनी असे म्हटले सरकार कडून प्रायव्हेसी, डेटा ट्रान्सफर आणि पॉलिसी संबंधित मागण्यात आलेल्या माहितीवर उत्तर द्यावे.(WhatsApp च्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर हायकोर्टाचे उत्तर, खासगी ॲप असून पसंद नसल्यास डिलिट करण्याचा दिला सल्ला)
मंत्रालयाकडून व्हॉट्सअॅपला विचारले गेले आहे की, जेव्हा भारताच्या संसदेकडून व्यक्तिगत डेटा सुरक्षा बिलावर विचार करत असून ते अशा स्थितीत या पद्धतीचा मोठा बदल का करत आहेत. तसेच व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हेसी पॉलिसीबद्दल युजर्सकडून संताप व्यक्त केला जात आहे. याच दरम्यान आता भारत सरकारने मंगळवारी असे म्हटले की, ते सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप कडून करण्यात येणाऱ्या बदलावांबद्दल विचार करत आहेत. त्याचसोबत खासगी माहितीची गुप्तता ठेवणे अत्यावश्यक आहे. रविशंकर प्रसाद यांनी 15व्या भारत डिजिटल शिखर सम्मेलन मध्ये म्हटले की, आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह संपर्कादरम्यान राष्ट्रीय सुरक्षिततेला अधिक महत्व दिले जाईल.
डेटा सुरक्षा आणि गुप्ततेच्या मुद्द्यांवरुन नुकत्याच भारतासह संपूर्ण जगभरातून व्हॉट्सअॅपच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला. दरम्यान व्हॉट्सअॅपने असे म्हटले की, त्यांच्या अॅपवरील मेसेज बद्दल पूर्णपणे गुप्तता पाळली जाते. व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक त्यांच्या माध्यमातून पाठवलेले खासगी मेसेज पाहू शकत नाहीत.(यूजर्संच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर WhatsApp ने नवीन Privacy Policy तीन महिन्यांसाठी पुढे ढकलली)
रविशंकर प्रसाद यांनी पुढे असे ही म्हटले की, या मुद्द्यावर काम सुरु करण्यात आले आहे. तर निर्णय घेण्याचा अधिकार असल्याने यावर कोणतीही टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही. मात्र एक गोष्ट स्पष्ट करतो की,व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा कोणतेही डिजिटल प्लॅटफॉर्म असो… आपण भारतात व्यवसाय करण्यास मोकळे आहात, परंतु येथे काम करणार्या भारतीयांच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याशिवाय असे करा. ”