WhatsApp Pay: या वर्षाअखेरीस भारतात लाँच होणार 'WhatsApp Pay', व्हॉट्सअॅपच्या ग्लोबल हेड ने दिली माहिती
दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
घड्याळ्याच्या काट्यावर चालणा-या माणसाला सध्या डिजिटल युग खूपच गरजेचे आहे. आज प्रत्येकाचा वेळ इतका महत्त्वाचा झाला आहे, की तो कुठे आणि कसा खर्च केला जावा हे देखील महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे सध्याच्या डिजिटल युगात केवळ एका मोबाईल क्लिक वरुन ऑनलाईन पेमेंट करणे खूपच फायदेशीर झाले आहे. पेटीएम सुरु झालेल्या या ऑनलाईन पेमेंट मोबाईल अॅपबरोबर PhonePe, Bhim App, Google Play यांसारखे बरेच अॅप सुरु झाले. या सर्वांना टक्कर देण्यासाठी आता लवरकच WhatsApp अॅप ही यात उडी टाकणार आहे. WhatsApp Pay असा नवीन अॅप आपण सुरु करणार असून या वर्षाअखेर पर्यंत भारतात लाँच करण्यात येईल अशी माहिती व्हॉट्सअॅपचे ग्लोबल हेड विल कॅथकार्ट यांनी दिली आहे. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकसत्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात WhatsApp Business मोठ्या प्रमाण वाढत आहे. लहान व्यवसाय व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत पोहचत आहेत. तसेच, वर्ष अखेरीस WhatsApp Payment सुरु करण्यात येईल, असेही विल कॅथकार्ट यांनी सांगितले.
हेही वाचा- Whatsapp ने युजर्ससाठी आणली 'ही' पाच नवी फीचर्स, आता चॅटिंग होणार आणखीन सोयीस्कर
या कार्यक्रमावरुन असे समजते की, व्हॉट्सअॅप कंपनी भारतात WhatsApp Business वर जास्त लक्ष केंद्रीत करत आहे. या कार्यक्रमात अनेक छोट्या उद्योगांच्या प्रमुखांनाही आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी व्हॉट्सअॅप कशाप्रकारे त्यांच्या उद्योगासाठी मदत करणार आहे, याबाबत माहिती देण्यात आली.
त्याचबरोबर अलीकडे व्हॉट्सअॅप मध्ये दोन नवे फिचर्स येणार आहेत असे सांगण्यात आले होते. नव्या फिचर्समध्ये युजर्सला त्यांनी व्हॉट्सअॅपवर म्युट केलेल्या व्यक्तीचे स्टेटस तुम्हाला दिसणार नाही आहे. म्हणजेच Hide Muted Status असे या नव्या फिचर्सचे नाव असून म्यूट केलेले स्टेटस हाईड केले जाणार आहेत. या फिचर्समुळे युजर्सला फायदा होणार आहे. मात्र सध्या म्यूट केलेले स्टेटसुद्धा टॅबच्या खालच्या बाजूस दिसतात.