WhatsApp चं End-To-End Encrypted Chat Backup युजर्ससाठी जारी; जाणून तुमच्या स्मार्टफोनमध्ये कसे कराल Enable?
तर 2016 पासून WhatsApp chats हे end-to-end encrypted आहे.
फेसबूकच्या (Facebook) मालिकीचं इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp) कडून आता चॅट बॅकअपसाठी End-to-End Encryption जारी करण्यात आले आहे. व्हॉट्सअॅपच्या या फीचर बाबत मागील अनेक महिन्यांपासून चर्चा होती. आता या नव्या फीचर मुळे युजर्स त्यांच्या चॅट्सचे बॅकाअप गूगल ड्राईव्ह किंवा आय क्लाऊड वर सुरक्षितपणे साठवू शकतात. Android आणि iOS अशा दोन्ही युजर्सना आता Encrypted Cloud Backups चा पर्याय खुला झाला आहे. यामुळे आता क्लाऊड स्टोरेज देणार्या गूगल किंवा अॅपलला देखील बॅकअप मधील चॅट्स वाचता येणार नाही.
व्हॉट्सअॅप कडून जगभरात हे Android आणि iOS साठी फीचर रोलआऊट केले आहे. हळूहळू ते सार्या युजर्सपर्यंत पोहचणार आहे. तुमच्यापर्यंत ते फीचर आले तर तुम्हांला मॅन्युअली end-to-end encryption for cloud backups साठी बदल करावा लागणार आहे. नक्की वाचा: WhatsApp च्या नवीन Cashback फिचरचे भारतात टेस्टिंग सुरु; जाणून घ्या काय आहे खासियत.
Mark Zuckerberg यांची माहिती
कसे कराल End-to-End Encryption for Cloud Backups?
तुमच्या मोबाईल फोन मध्ये व्हॉट्सअॅपच्या Settings > Chats > Chat Backups > End-to-End encrypted backups चा पर्याय निवडा. त्यानंतर स्क्रीन वर दिलेल्या सूचना पाळा. त्यानंतर Done वर क्लिक करा. पुढे व्हॉट्सअॅप कडून end-to-end backup साठी बदल करण्यासाठी काही वेळ द्या. जर तुम्ही पासवर्ड किंवा की विसरलात तर तुम्हांला end-to-end encrypted backup रिस्टोअर करता येणार नाही हे देखील लक्षात ठेवा.
व्हॉट्सअॅप कडून End-to-End Encrypted chat backups feature चे टेस्टिंग मागील अनेक महिन्यांपासून करत होते. तर 2016 पासून WhatsApp chats हे end-to-end encrypted आहे.