WhatsApp Group Chats, User Profiles गूगल सर्च रिझल्ट वर दिसत असल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, मात्र आता Issue सोडवल्याची व्हॉट्सअ‍ॅपची माहिती

मात्र आता व्हॉट्सअ‍ॅप कडून या बाबीची दखल घेण्यात आली असून त्याचे गूगल रिझल्ट थांबवण्यात आले आहेत.

WhatsApp Logo (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) आता प्रायव्हसी सेटिंगमध्ये बदल केल्याने अनेकांकडून या नव्या नियमावलीत सुरक्षेवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशामध्येच काल सायबर सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहरीया यांनी लोकांची व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाईल्स गूगल सर्च वर रिझल्टमध्ये दिसत असल्याचं समोर आल्यानंतर पुन्हा युजर्सना त्यांच्या प्रोफाईलच्या सुरक्षेबाबत भीती निर्माण झाली होती. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅप कडून या बाबीची दखल घेण्यात आली असून त्याचे गूगल रिझल्ट थांबवण्यात आले आहेत. दरम्यान अशाप्रकारे गूगल रिझल्टवर वर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या लिंक्स, प्रोफाईल्स दिसण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. 2019 मध्येही अशा गोष्टी झाल्या होत्या आणि त्या तेव्हाच निर्दशनास आणून प्रश्न सोडवण्यात आला होता. WhatsApp युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! 'हे' काम न केल्यास अकाऊंट होईल डिलीट.

सायबर सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहरीया यांनी काल ट्वीट करत याची माहिती दिली तेव्हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या लिंक्स या बांग्ला, मराठी अधा भाषिक, विशिष्ट कम्युनिटीच्या देखील गूगलवर इंडेक्स झाल्या होत्या. यामध्ये काही ग्रुपमध्ये pornography देखील शेअर झाल्याचं गूगल सर्च रिझल्टवर दिसत असल्याचं पहायला मिळालं होतं.

व्हॉट्सअ‍ॅपने दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी गूगलकडे हा फीडबॅक पाठवला आहे. त्यामध्ये फॅट इंडेक्स न करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान मार्च 2020 पासून व्हॉट्सअ‍ॅपने no index टॅग हे त्याच्या सार्‍या डीप लिंक पेजेसमध्ये टाकले आहेत. त्यामुळे गूगल कडून ते सर्च रिझल्टवर इंडेक्स होऊ शकत नाही. एक रिमाईंडर म्हणून कोणी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन केल्यास सार्‍यांना त्याचं नोटिफेशन जातं. तेव्हा अ‍ॅड्मिन ग्रुपमध्ये ग्रुप इंव्हाईट लिंक कोणत्याही क्षणी बदलू शकतो असा खुलासा एका स्टेटमेंटद्वारा करण्यात आला आहे.