व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक झाल्यावर नेमके काय कराल ?
अशावेळी व्हॉट्सअॅप अकाऊंट कसे सुरक्षित ठेवाल. त्याचबरोबर व्हॉट्सअॅप हॅक झाल्यावर काय कराल? जाणून घेऊया...
भारतात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या 20 कोटीहून अधिक आहे. अशावेळी सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अलिकडेच कंपनीने दावा केला आहे की, अॅंड टू अॅंड इनक्रिप्शन सिक्युरीटी युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवते. तरी देखील व्हॉट्सअॅप हॅक केले जाते. हॅकर्स फिजिकल माध्यमातूनही व्हॉट्सअॅप हॅक करु शकतात. अशावेळी तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट कसे सुरक्षित ठेवाल. त्याचबरोबर व्हॉट्सअॅप हॅक झाल्यावर काय कराल? जाणून घेऊया...
हॅक झाल्यावर सर्वप्रथम हे करा
व्हॉट्सअॅपवर WhatsApp Web या ऑप्शनवर जा. तिथे WhatsApp Web हा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा आणि नंतर LOG OUT बटणावर क्लिक करा. त्यानतंर तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट ज्या डिव्हाईसची कनेक्ट होईल ते सर्व डिस्कनेक्ट होतील.
जर तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट एक्सेस करु शकत नसाल तर support@whatsapp.com वर मेल करुन अकाऊंट डिअॅक्टीव्हेट करा. त्यानंतर जर तुम्ही 30 दिवसांपर्यंत अकाऊंट एक्सेस करु शकत नसाल तर ते आपोआप डिलीट होईल.
हॅक होऊ नये म्हणून अशी घ्या खबरदारीः
अॅप सिक्युरीटी
व्हॉट्सअॅपला पासवर्ड, पिन किंवा पटर्न सेट करुन लॉक करा. त्यामुळे कोणतीही व्यक्ती तुमचे अकाऊंट पाहु शकणार नाही.
वायफाय नेटवर्क
कोणत्याही अनोळखी जागी वायफाय कनेक्ट करुन वापरणे धोकादायक ठरू शकते. हॅक्सर्स वायफाय कनेक्शनवरुन स्मार्टफोन हॅक करु शकतात. याशिवाय यूनिक MAC अॅड्रेसवरुन व्हॉट्सअॅप चॅट एक्सेस करु शकता.
2 step verification कामी येईल
हे फिचर व्हॉट्सअॅपला अधिक सिक्युरीटी देतं. याच्या माध्यमातून तुमचे अकाऊंट हॅक होण्यापासून सुरक्षित राहील.