खुशखबर! Vodafone आणला नवा इंटरनेट प्लान, 251 रुपयात मिळणार 50GB डेटा

मात्र यात तुम्हाला कॉलिंगची सुविधा मिळणार लनाही. त्यासाठी तुम्हाला वेगळे रिचार्ज करावे लागेल.

Vodafone (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन (Lockdown 5.0) 30 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. यामुळे अनेक खाजगी कंपन्यांतील कर्मचारी 'Work From Home' च्या माध्यमातून ऑफिसचे काम करत आहे. अशा वेळी त्यांना कमी डेटा पॅकमुळे कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून वोडाफोनने (Vodafone) एक नवा डेटा पॅक आणला आहे. या नव्या पॅकमध्ये 251 रुपयांत 50GB डेटा मिळत आहे. या जबरदस्त डेटा प्लानची वैधता 28 दिवस असणार आहे. हा नवा वो़ाफोन प्लान तुम्हाला वेबसाइट तसेच अॅपवरुन ही घेता येईल.

वोडाफोनच्या 251 च्या प्लानमध्ये तुम्हाला 28 दिवसांची 50GB डेटा मिळेल. मात्र यात तुम्हाला कॉलिंगची सुविधा मिळणार लनाही. त्यासाठी तुम्हाला वेगळे रिचार्ज करावे लागेल. Internet Speed चा विश्वविक्रम; अवघ्या 1 सेकंदात 1000 पेक्षा जास्त HD फिल्म्स झाल्या डाऊनलोड, जाणून घ्या काय आहे स्पीड

हा डेटा प्लान वाउचर अशा युजर्ससाठी खूप फायदेशीर आहे जे जास्त इंटरनेटचा वापर करताता. हा प्लान मर्यादित भागांसाठी उपलब्ध होईल. सध्या तरी हा प्लान बिहार, चेन्नई, गुजरात, हरियाणा, केरळ, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश पूर्व मध्ये उपलब्ध आहे.

अलीकडेच कंपनीने आपल्या 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे युजर्संना 6GB एक्स्ट्रा डेटा मोफत मिळेल. हा कंपनीचा अॅड-ऑन डेटा प्लॅन (Add on Data Plan) आहे. यामुळे युजर्संना अतिरिक्त डेटाचा आनंद घेता येईल. वोडाफोनने 98 रुपयांचा प्लॅन रिव्हाईज केला असून यात युजर्संना 6GB एक्स्ट्रा डेटा मोफत मिळेल. यामुळे ग्राहकांना डेटाचा आनंद घेता येईल. मात्र यात फ्री कॉलिंगची सुविधा देण्यात आलेली नाही. याची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. सध्या सुरु असलेल्या प्लॅनमध्ये हा प्लॅन अॅक्टीव्ह केल्यास पूर्वीच्या प्लॅनची व्हॅलिडीटी संपल्यानंतरही हा प्लॅन सुरु राहील. वोडाफोन वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, युजर्संना या प्लॅनअंतर्गत एकूण 12 GB डेटा मिळेल.