Vodafone ने पुन्हा आणला 19 रुपयांचा रिचार्ज प्लॅन, युजर्सला मिळणार अधिक डेटा
यामध्ये 398 आणि 558 रुपयांचा प्लॅन असून त्यात दररोज डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह प्रतिदिवसाला 100 फ्री एसएमएस आणि अन्य बेनिफिट्स सुद्धा देण्यात येणार आहेत.
वोडाफोन कंपनीने नुकतेच दोन नवे प्रीपेड प्लॅन रोलआऊट केले होते. यामध्ये 398 आणि 558 रुपयांचा प्लॅन असून त्यात दररोज डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह प्रतिदिवसाला 100 फ्री एसएमएस आणि अन्य बेनिफिट्स सुद्धा देण्यात येणार आहेत. या रिचार्ज प्लॅन सोबत आता कंपनीने पुन्हा 19 रुपयांचा अनलिमिटेड प्रीपेड प्लऐन सुद्धा परत आणला आहे. यामध्ये युजर्सला पूर्वीपेक्षा अधिक डेटा मिळणार आहे. त्यानुसार 150 ऐवजी आता 200MB डेटा देण्यात येणार आहे. या प्लॅनची वॅलिडिटी मात्र 2 दिवस असणार आहे. पण युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.
तसेच वोडाफोनचा 39 रुपयांचा ऑलराउंडर प्लान आला आहे. हा ठराविक ग्राहकांपुरताच मर्यादित आहे. यात फुल टॉक टाइमसह 100 एमबी डेटा मिळणार आहे. या प्लानची वैधता 28 दिवसांची असणार आहे.तर प्लॅनमध्ये मिळणारे अन्य बेनिफिट्सबाबत बोलायचे झाल्यास त्यामध्ये वोडाफोन प्ले, मोबाईल शील्ड आणि G5 चे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार असून त्याची किंमत 999 रुपये आहे.(ग्राहकांसाठी व्होडाफोन लॉन्च करणार सर्वात स्वस्त प्लॅन; केवळ 39 रुपयांपासून होणार सुरुवात)
त्याचसोबत 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला 200GB डेटा 100 फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये एका वर्षासाठी अॅमेझॉन प्राइम आणि G5 चे फ्री एक्सेस मिळणार आहे. तसेच कंपनीने युजर्सला 598 रुपयांपासून सुरु होणारा My Family प्लॅन सुद्धा घेऊन आला आहे.या मध्ये दोन क्रमांक जोडता येणार आहेत. प्रायमरी कनेक्शनसाठी प्लॅनमध्ये प्रत्येक महिन्याला 80 जीबी डेटा आणि सेकंडरी कनेक्शनमध्ये प्रत्येक महिन्याला 30 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच प्लॅनमध्ये 200 जीबीचा रोलओवर डेटा बेनिफिट देण्यात येणार आहे.