Vodafone-Idea कंपनीचे 'हे' धमाकेदार इंटरनेट पॅक वर्क फ्रॉम होमसाठी ठरतील फायदेशीर

Vodafone-Idea देशातील तिसरा मोठी टेलिकॉम कंपनी आहे. वोडाफोन-आयडियाचे प्रत्येक रेंजमधील रिचार्ज प्लॅन आहेत. यामध्ये हाय-स्पीड डेटा, फ्री कॉलिंसह प्रीमियम अॅपचे सब्सक्रिप्शन दिले जात आहे.

Vodafone Idea Merger Representational Asset (Photo Credit: TheIndianWire)

Vodafone-Idea देशातील तिसरा मोठी टेलिकॉम कंपनी आहे. वोडाफोन-आयडियाचे प्रत्येक रेंजमधील रिचार्ज प्लॅन आहेत. यामध्ये हाय-स्पीड डेटा, फ्री कॉलिंसह प्रीमियम अॅपचे सब्सक्रिप्शन दिले जात आहे. याच संदर्भात आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत. हे पॅक तुमच्या इंटरनेटची गरज पूर्ण करणार आहे. जाणून घ्या वोडाफोन-आयडिया कंपनीच्या धमाकेदार इंटरनेट पॅकबद्दल.

वोडाफोन-आयडियाच्या पोर्टफोलियो मध्ये 251, 351, 355 आणि 501 रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. यामध्ये 355 आणि 501 रुपयेचा डेटा वाउचर-द-टॉप म्हणजेच OTT च्या सब्सक्रिप्शनसह येणार आहे. यामधील पहिला प्लॅन 251 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला 50GB डेटा 28 दिवसांसाठी मिळणार आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. परंतु या प्लॅनसह ओटीटी सब्सक्रिप्शन सारखे बेनिफिट्स नाही दिले जाणार आहेत.(5G Technology आणि Spectrum परीक्षणाला दूरसंचार मंत्रालयाचा हिरवा झेंडा; भारतभरात वेगवेगळ्या ठिकाणी दूरसंचार कंपन्या करणार 5G परीक्षणाला सुरूवात)

तसेच 351 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन मध्ये 100GB डेटा 56 दिवसांसाठी मिळणार आहे. या प्लॅनचा उपयोग वर्क फ्रॉम होमसाठी केला जाऊ शकतो. यामध्ये सुद्धा ओटीटी सब्सक्रिप्शन सारखे बेनिफिट्स मिळणार नाहीत. त्याचसोबत 355 रुपयांचे डेटा अत्यंत खास आहे. कारण यामध्ये युजर्सला एका वर्षासाठी ZEE5 अॅपचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. त्याचसोबत 28 दिवसांचा 50GB डेटा मिळणार आहे. तर 501 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला 75GB  डेटा 56 दिवसांसाठी येणार आहे. परंतु युजर्सला Disney+ Hotstar VIP चे सब्सक्रिप्शन एका वर्षासाठी मिळणार आहे.(Netflix ने लॉन्च केले ‘Play Something’ फिचर; युजर्सचा कल पाहून दाखवणार आवडीचे प्रोग्राम)

जर तुम्ही वोडाफोन-आयडिया मध्ये चार डेटा प्लॅनचे रिचार्ज करायचा असल्यास कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून रिचार्ज करता येणार आहे. त्यामुळे प्रथम मोबाईल क्रमांक टाकून त्यानंतर ओटीपी येणार आहे. त्यानंतर एंटर केल्यानंतर लॉग-इनची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. लॉग-इन केल्यानंतर वेबसाइट किंवा मोबाईल अॅपमध्ये जाऊन डेटा वाउचर सर्च करा. आता तुम्हाला रिचार्ज प्लॅन दाखवले जातील. डेटा पॅक निवडल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करावे. असे केल्यानंतर तुमचा डेटा पॅक अॅक्टिव्ह होणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now