Vodafone चा बेस्ट प्रीपेड प्लॅन 399 रुपयांपासून सुरु, जाणून घ्या युजर्सला कोणत्या सुविधा मिळणार

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला रिलायन्स जिओसह अन्य टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या दरात वाढ केली आहे. त्यानुसार टॅरिफ प्लॅन 40 टक्क्यांनी अधिक वाढवले आहेत. मात्र जर तुम्ही नव्या टॅरिफ प्लॅनमुळे त्रस्त असलात तर तुम्ही पोस्टपेड मध्ये तुमचा क्रमांक कनवर्ट करु शकता.

Vodafone (Photo Credit Which.co.uk)

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला रिलायन्स जिओसह अन्य टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या दरात वाढ केली आहे. त्यानुसार टॅरिफ प्लॅन 40 टक्क्यांनी अधिक वाढवले आहेत. मात्र जर तुम्ही नव्या टॅरिफ प्लॅनमुळे त्रस्त असलात तर तुम्ही पोस्टपेड मध्ये तुमचा क्रमांक कनवर्ट करु शकता. तर वोडाफोन कंपनीने काही बेस्ट प्रीपेड प्लॅन सुरु केले असून त्यांची सुरुवाती किंमत 399 रुपये आहे. यामध्ये युजर्सला इंटरनेट सुविधा, एसएमएस पाठवण्यासह अन्य ऑप्शन सुद्धा दिले जाणार आहेत.

वोडाफोन RED अंतर्गत येणारे प्लॅन बंद केले होते. मात्र आता पुन्हा ते सुरु करण्यात आले आहेत. या प्लॅनची सुरुवाती किंमत 399 रुपये ठेवण्यात आली आहे. या प्लॅनअंतर्गत युजर्सला अनलिमिटेड वॉईस कॉलिंगसह दररोज 100 फ्री एसएमएस पाठवता येणार आहेत. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या युजर्सला महिन्याला 40GB डेटा देण्यात येणार आहे. या प्लॅनची खासियत म्हणजे यामध्ये युजर्सला त्यांचा उर्वरित डेटा पुढील महिन्यात वापरता येणार आहे. याची रोलआउट डेटाची लिमिट 200GB पर्यंत आहे. कंपनीकडून पोस्टपेड प्लॅनच्या नव्या ग्राहकांसाठी 6 महिन्यापर्यंत 150GB अॅडिशन डेटा ऑफर करत आहे.(Airtel Payments Bank: एअरटेल पेमेंट बँकेने सुरू केली 24x7 NEFT सेवा; सुट्टीच्या दिवशीही पैसे ट्रान्सफर करता येणार)

 प्लॅनमध्ये मिळणारे अन्य बेनिफिट्सबाबत बोलायचे झाल्यास त्यामध्ये वोडाफोन प्ले, मोबाईल शील्ड आणि G5 चे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार असून त्याची किंमत 999 रुपये आहे. त्याचसोबत 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला 200GB डेटा 100 फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये एका वर्षासाठी अॅमेझॉन प्राइम आणि G5 चे फ्री एक्सेस मिळणार आहे. तसेच कंपनीने युजर्सला 598 रुपयांपासून सुरु होणारा My Family प्लॅन सुद्धा घेऊन आला आहे. या मध्ये दोन क्रमांक जोडता येणार आहेत. प्रायमरी कनेक्शनसाठी प्लॅनमध्ये प्रत्येक महिन्याला 80 जीबी डेटा आणि सेकंडरी कनेक्शनमध्ये प्रत्येक महिन्याला 30 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच प्लॅनमध्ये 200 जीबीचा रोलओवर डेटा बेनिफिट देण्यात येणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now