Vivo Y53s स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत
फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज दिला आहेय त्याचसोबत 3GB एक्सटेंडेट रॅमचा सपोर्ट मिळणार आहे. फोनमध्ये 1TB एक्सपैंडेबल स्टोरेजचा ऑप्शन दिला जाणार आहे.
Vivo Y53s स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज दिला आहेय त्याचसोबत 3GB एक्सटेंडेट रॅमचा सपोर्ट मिळणार आहे. फोनमध्ये 1TB एक्सपैंडेबल स्टोरेजचा ऑप्शन दिला जाणार आहे. विवो वाय53एस स्मार्टफोन दोन कलर ऑप्शन Deep Sea Blue आणि Fanstastic Rainbow मध्ये उपलब्ध आहे. फोनची किंमत 16,490 रुपये आहे. ग्राहकांना फोन विवो स्टोअर व्यतिरिक्त फ्लिपकार्ट, अॅमेझॉन येथून खरेदी करता येणार आहे.
स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.58 इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला आहे.याचे रेजॉल्यूशन 2408X1080 पिक्सल आहे. पोन एक साइड माउंडेट फिंगरप्रिंट स्कॅनरसह येणार आहे. याच्या मदतीने फोन एकूण 0.24 सेकंदात सुरु करता येईल. तसेच फोनच्या रियर पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा मुख्य 64MP चा कॅमेरा असणार आहे. तर 2MP चा बोहेक लेन्स आणि 2MP ची मॅक्रो लेन्स दिली जाणार आहे. त्याच्या मदतीने 4 सेमी दूर ऑब्जेक्टचा फोटो क्लिक करता येणार आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.(Samsung Smartphone: सॅमसंगने दिली ग्राहकांसाठी 'ही' खास ऑफर, 11 तारखेला होणार लाँचिंग सोहळा)
Tweet:
या फोनला MediaTek Helio G80 प्रोसेसर सपोर्ट करणार आहे. फोन अॅन्ड्रॉइड 11 आधारित Funtouch OS 11.1 वर काम करणार आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. याच्या 18W फास्ट चार्जर सपोर्टसह तो येणार आहे. फोन सिंगल चार्जमध्ये 14.2 तासांची बॅटरी देतो.