Vivo V20 (2021) स्मार्टफोन Amazon India वर विक्रीसाठी उपलब्ध; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Vivo V20 2021 स्मार्टफोन चा सेल सुरु झाला आहे. हा स्मार्टफोन भारतात ऑक्टोबर महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. आता हा स्मार्टफोन अॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Vivo V20 (2021) (Photo Credits: Amazon India)

Vivo V20 2021 स्मार्टफोन चा सेल सुरु झाला आहे. हा स्मार्टफोन भारतात ऑक्टोबर महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. आता हा स्मार्टपोन अॅमेझॉनवर (Amazon) खरेदीसाठी उपलब्ध आहे. नुकताच हा स्मार्टफोन BIS (Bureau of Indian Standards) या वेबसाईटवर आढळून आला होता. हा स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध आहे- Sunset Melody आणि Midnight Jazz. Vivo V20 2021 स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले 2400x1080 पिक्सेल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉम स्पॅनड्रगन 730G प्रोसेसर दिला असून यात 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. (Year Ender 2020: भारतीय बाजारात 2020 वर्षात धुमाकूळ घातलेले 'हे' होते सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन्स)

 

Vivo V20 (2021) (Photo Credits: Amazon India)

यात ट्रिपर रियर कॅमेरा देण्यात आला असून 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा सुपर वाईड एन्गल लेन्स आणि 2MP चा मोनो सेन्सर आहे. 44MP चा फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी देण्यात आला आहे. (Vivo Y51 स्मार्टफोन भारतात लॉन्च, किंमतीसह खासियत जाणून घ्या)

Vivo V20 (2021) (Photo Credits: Amazon India)

हा स्मार्टफोन अॅनरॉईड 11 बेस्ड Funtouch OS 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यात 4000mAH ची बॅटरी 33W च्या फास्ट चार्गिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे. कनेक्टीव्हीटीसाठी यात 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, a USB Type-C port आणि फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या 8GB आणि 128GB मॉडेलची किंमत 24,990 इतकी आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now