BSNL Cheapest Recharge Plan: अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि 30 दिवसांची वैधता; BSNL चा हा छोटा रिचार्ज सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम

यामध्ये अरेना मोबाईल गेमिंगचा अतिरिक्त फायदा मिळतो.

BSNL | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Jio, Airtel आणि Vodafone-Idea (Vi) ने त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत, तर सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतींमध्ये अद्याप कोणताही बदल केलेला नाही. BSNL कडे ग्राहकांसाठी प्रीपेड आणि पोस्टपेड योजनांची विस्तृत श्रेणी आहे. यामुळेच लोक आता इंटरनेटवर बीएसएनएलच्या सर्वात स्वस्त अनलिमिटेड कॉलिंग प्लॅनबद्दल शोध घेत आहेत.  (हेही वाचा - How to Port Your Sim to BSNL? जाणून घ्या आपला मोबाइल नंबर बीएसएनएल मध्ये कसा पोर्ट कराल, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया)

बीएसएनएलचा 229 रुपयांचा एक उत्तम प्लॅन आहे, जो इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. हे देशातील सर्व मंडळांमधील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. हा प्लान सक्रिय केल्यावर ग्राहकांना चांगला डेटा देखील मिळतो.

पाहा पोस्ट -

BSNL च्या 229 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये, ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 2GB दैनिक डेटा आणि 100 दैनिक एसएमएस मिळतात. यामध्ये अरेना मोबाईल गेमिंगचा अतिरिक्त फायदा मिळतो. या प्लॅनची ​​वैधता ३० दिवसांची आहे. तथापि, ग्राहकांना या प्लॅनमध्ये 4G डेटा स्पीड मिळणार नाही, कारण BSNL कडे सध्या फक्त 2G सेवा उपलब्ध आहे. 2025 च्या अखेरीस 4G सेवा सुरू होईल अशी अपेक्षा आहे.