Ullu App to Close? उल्लू ॲप बंद होण्याची शक्यता; Adult Content बाबत मंत्रालयात तक्रार, Apple आणि Google वरही कारवाईची मागणी
तक्रारदाराने एका शोचे स्क्रीनशॉट देखील जोडले आहेत, जिथे शाळकरी मुलांमधील लैंगिक संबंधांचे चित्रण केले आहे.
Ullu App to Close? ओटीटीवर बोल्ड आणि हॉट कंटेंटसाठी प्रसिद्ध असणारी कंपनी उल्लू (Ullu App) तिच्या कंटेंटबाबत अडचणीत येऊ शकते. उल्लू प्लॅटफॉर्मवर फक्त अडल्ट कंटेंट आणि त्याच प्रकारच्या सिरीज मोठ्या प्रमाणात स्ट्रीम केल्या जातात. म्हणूनच आता नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने या कंटेंटच्या आणि कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. बालहक्कांशी संबंधित या संस्थेने आरोप केला आहे की, या कंपनीने लहान मुलांना अडल्ट कंटेंटचा प्रवेश दिला तसेच कंपनीच्या कंटेंटमध्ये शालेय मुलांना लैंगिक क्रियाकलापांमध्ये दाखवण्यात आले आहे. एनसीपीसीआरने आयटी मंत्रालयाला कंपनीवर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
नॅशनल चाइल्ड राइट्स बॉडीने 27 फेब्रुवारीला इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाला (MeitY) पत्र लिहून गुगल आणि ॲपलवरही कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. संघटनेने विनंती केली आहे की उल्लू किंवा त्यासारखे कोणतेही ॲप ऍक्सेस करण्यासाठी ॲप स्टोअरवर कठोर केवायसी नियम बनवावेत.
एनसीपीसीआरचे अध्यक्ष प्रियांक कानुंगो यांनी MeitY ला लिहिले आहे की, बॉलीवूडच्या बड्या मंडळींनी आयोगाकडे तक्रार पाठवली आहे की, प्ले स्टोर आणि आयओएस मोबाईल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या उल्लू ॲपवर अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर आहे. आयटी मंत्रालयाला पत्र लिहून, एनसीपीसीआरने अशा ॲप्सशी संबंधित नियम आणि धोरण प्रमाणीकरणाची माहिती मागितली आहे.
उल्लू ॲपचा शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांवर नकारात्मक परिणाम होत आहे. असे सांगण्यात आले आहे की उल्लू ॲपवर अश्लील सामग्री आहे जी शाळकरी मुलांची दिशाभूल करू शकते. पत्रानुसार, उल्लू ॲप गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस च्या कोणत्याही केवायसी पॉलिसी किंवा वय पडताळणी नियमांचे पालन करत नाही. याशिवाय त्याच्यावर POCSO कायद्याचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. कमिशनला तक्रार प्राप्त झाली आहे की, प्ले स्टोअर आणि आयओएस मोबाइल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या 'उल्लू ॲप'मध्ये लहान मुलांसह ग्राहकांसाठी गुप्तपणे अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंट उपलब्ध आहे. (हेही वाचा: Google Reinstates Delisted Indian Apps: सरकारी हस्तक्षेपामुळे गुगलने पुन्हा Restored केले Naukri, 99acres अॅप्स)
बालहक्क संघटनेने असा आरोप केला आहे की, असे काही विशिष्ट शो आहेत जे लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट दृश्ये आणि कथानकांसह शालेय मुलांना लक्ष्य करतात. तक्रारदाराने एका शोचे स्क्रीनशॉट देखील जोडले आहेत, जिथे शाळकरी मुलांमधील लैंगिक संबंधांचे चित्रण केले आहे. दरम्यान, अलीकडेच बातमी आली की उल्लू आपला आयपोओ (IPO) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2023 मध्ये 31 कोटी रुपयांचा कंटेंट खरेदी केला. या कालावधीत त्यांचा उत्पादन खर्च 3.7 कोटी रुपयांवरून 9.5 कोटी रुपयांवर गेला. उल्लूची सदस्यता 2020 मध्ये वार्षिक 198 रुपयांवरून आता 459 रुपयांवर गेली आहे. उल्लूचे 20 लाखांहून अधिक ग्राहक आहेत.