Twitter लवकरच सादर करणार 'Hide Replies' हे नवं फिचर; ट्रोलिंगला बसणार चाप

तसेच तोटे देखील आहेत. त्यामुळे सोशल मीडिया आणि ट्रोलिंग हे एक समीकरणचं झालं आहे.

Twitter (Photo Credits: IANS)

अनेकदा ट्रोलर्सकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र काही वेळा हे ट्रोलर्स डोकेदुखी ठरतात. त्यामुळे आता सोशल मीडियावर ट्रोलिंगला चाप बसणे गरजेचे झाले आहे. यासाठीच मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरनं नवं फिचर आणलं आहे. हाईड रिप्लाय असे या फिचरचे नाव असून यामुळे आता तुमच्या ट्विटवर येणारे रिप्लाय तुम्हाला सेट करता येणार आहेत. नको असलेले रिप्लाय तुम्ही हाईड करु शकता.

hide reply हे प्रायव्हसी फिचर सध्या काही देशांमध्ये सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळे तुमच्या ट्विटवर कोणाचा रिप्लाय दिसणार, हे आता तुम्हाला ठरवता येणार आहे.

ट्विटरचे hide reply हे फिचर अॅक्टीव्हेट करण्यासाठी ट्विटच्या पर्यायांवर क्लिक करा. त्यानंतर Hide replies वर क्लिक केल्यानंतर आपल्याला नको तो रिप्लाय हाईड होईल. त्यामुळे ट्रोलिंगला चाप बसणार आहे. हे फिचर कॅनडात सुरु करण्यात आलं असून लवकरच ते इतर देशातही सुरु करण्यात येईल.

Hide Replies या नव्या फिचरमुळे आता ट्रोलिंगला आळा बसेल किंवा नकारात्मक, वाईट कमेंट्स आल्या तरी त्या इतरांपर्यंत पोहचणार नाहीत, याची खबरदारी या फिचरद्वारे घेता येईल. परिणामी ट्रोलिंग होणार नाही. (Twitter.com चा नवा अंदाज; नव्या डिझाईन सह खास फिचर्स सादर)

अलिकडेच ट्विटरने आपला चेहरामोहरा बदलत आपल्या युजर्ससाठी नवे फिचर्स सादर केले आहेत. यापूर्वी ट्विटरने ट्विटची शब्दमर्यादा वाढवली होती.