Twitter.com चा नवा अंदाज; नव्या डिझाईन सह खास फिचर्स सादर
Twitter (Photo Credits: IANS)

अमेरिकन सोशल मीडिया (Social Media) कंपनी ट्विटर (Twitter) आजपासून एका नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. 2006 साली लॉन्च झालेल्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये युजर्सला चांगला अनुभव देण्यासाठी बदल करण्यात आले आहे. यंदा कंपनीने दर्जेदार फिचर्स सह नवे डिझाईन देखील सादर केले आहे. थीम, क्लीनर डिझाईन यात बदल करत कंपनीने ट्विटरला नवे रुप प्रदान केले आहे.

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरच्या प्रवक्तांनी सांगितले की, युजर्सला चांगला अनुभव देण्यासाठीच Twitter.com च्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आले आहेत. या नव्या डिझाईनचे परिक्षण कंपनीकडून सुमारे वर्षभर आधी सुरु होते. त्यानंतर सर्व युजर्ससमोर नवे ट्विटर सादर झाले आहे. हे सर्व जरी असले तरी ट्विट एडिट करण्याचा पर्याय कंपनीने अद्याप दिलेला नाही. मात्र यात मोबाईल अॅप असलेले फिचर्स सादर करण्यात आले आहेत.

Twitter.Com मध्ये झालेले बदल पहा व्हिडिओच्या माध्यमातून:

Twitter.com मध्ये झालेले मुख्य बदल:

# ‘एक्सप्लोर’टॅब आता डेक्सटॉपवर उपलब्ध आहे. यामुळे लाईव्ह व्हिडिओ आणि घटना शोधणे सोपे झाले आहे.

# साईट नेव्हिगेशन मेनूच्या माध्यमातून बुकमार्क, सूचना आणि तुमच्या प्रोफाईलचा उपयोग करणे सोपे झाले आहे.

# डायरेक्ट मेसेज आता अधिक मोठ्या शब्दात पाहू शकता.

# नव्या डिझाईनमध्ये युजर्सला रिप्लाय आणि प्रतिक्रीया देण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे बनवण्यात आले आहे.

# आता युजर एकाच स्क्रिनवर आपले वेगवेगळे चॅट्स पाहू शकतात.

# साईडबार मेन्यू देखील अधिक सोपा करण्यात आला आहे. ज्यात युजर्सला अकाऊंट स्विच करणे सोपे होईल.

# युजर्सला डार्क मोडसाठी दोन पर्याय देण्यात आले आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या थीम आणि रंगांचा पर्याय देखील यात देण्यात आला आहे.

सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरने यापूर्वीच एका मोठा बदल करत ट्विटची शब्दमर्यादा 140 अक्षरांवरुन 280 केली आहे. त्याचबरोबर स्पॅम पाठवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी कोणताही ट्विटर युजर एका दिवसात 400 हून अधिक नवे हँडल्स फॉलो करु शकत नाही.