Twitter Subscription: आजपासून ट्विटर वापरासाठी मोजावे लागणार पैसे, ट्विटर सबस्क्राईब चार्ज आकारण्यास आजपासून सुरुवात
अन्ड्रॉइड मोबाईल वापरकर्त्यांना ८ डॉलर म्हणजेचं जवळजवळ ६५९ रुपये तर आयफोन वापरकर्त्यांना ११ डॉलर म्हणजे ९०७ रुपये सबस्क्रीपशन फी द्यावी लागणार आहे.
ट्विटर वापारासाठी आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहे. कारण आजपासून म्हणजेचं १२ डिसेंबर पासून ट्विटर आपल्या वापरकर्त्यांकडून सबस्क्रिपशन चार्ज आकारणार आहे. अन्ड्रॉइड मोबाईल वापरकर्त्यांना ८ डॉलर म्हणजेचं जवळजवळ ६५९ रुपये तर आयफोन वापरकर्त्यांना ११ डॉलर म्हणजे ९०७ रुपये सबस्क्रीपशन फी द्यावी लागणार आहे. तरी तुम्ही ट्विटर वापरकर्ते असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. तरी हे सब्सक्रीप्शन चार्जेस केवळ ट्विटर ब्लू टीक धारकांना द्यावे लागणार आहे. आजपासून ट्विटर पुन्हा एकदा ट्विटर ब्लूटिकला सुरुवात करणार आहे. पण तुम्ही तुमचं ट्विटरवर जे आहे तेचं नाव तुम्हाला कायम ठेवावं लागणार आहे. कारण तुम्ही तुमच्या नावात काही बदल केल्यास किंवा नाव एडिट केल्यास तुम्हाला तुमची ब्लू टीक कायमची गमवावी लागणार आहे.
याचसोबत मायक्रॉब्लॉगिंग साईट अशी ओळख असलेल्या ट्विटर आता मायक्रॉब्ल़ॉगर राहिला नाही असं म्हण्टंल तरी हरकत नाही. कारण आता ट्विटर पोस्टची शब्द मर्यादा आता २८० शब्दांहून थेट ४००० शब्द एवढी करण्यात आली आहे. ट्विटरचे सीईओ दस्तुरखुद्द एलन मस्क (Elon Musk) यांनीच ही माहिती दिली आहे. एलन मस्क (Elon Musk On Tweet Word Limit) यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्विटर (Twitter News) आता ट्विटची 280 शब्दांची मर्यादा दूर करुन ती वाढवत आहे. नव्या बदलानुसार ट्विटरवर तब्बल 4000 शब्दांचे भलामोठा लेखही युजर्सला लिहिता येणार आहे. (हे ही वाचा:- Twitter Recommended Features: Elon Musk ने ट्विटरवर जोडले 'हे' खास फिचर; काय आहे खास? जाणून घ्या)
तरी आता पुढील काहीचं दिवसात ट्विटरवर ट्विट एडिट, ट्विटर डेटा मॉनिटायजेशन यासारखे नवनवीन ऑप्शन दिसुन येणार आहेत. ट्विटरचे मालक एलॉन मस्क झाल्यापासून ट्विटरमध्ये १८० अंशाचे बदल बघायला मिळाले आहेत. तरी पुढील काही दिवसांत ट्विटर णखी काय नवे फिचर किंवा अपडेट्स घेवून येतो ह्याचा काहीच नेम नाही.