IPL Auction 2025 Live

Twitter Blue Tick: ट्विटर ने 'ब्लू टिक' साठी सुरु केले अकाउंट्सचे वेरिफिकेशन

गुरुवारी कंपनीने सांगितले की, त्यांनी जे ट्विटर खाते पडताळणीच्या नियमांत बसत नसतील त्यांचे स्वत: ब्लू टिक हटविण्यास सुरुवात केली आहे.

Twitter (Photo Credits: IANS) .. Read more at: https://www.latestly.com/technology/twitter-announces-to-bring-fleets-feature-in-testing-phase-to-india-1812104.html

अनेक दिग्गजांपासून सेलिब्रिटींपर्यंत जगभरात प्रसिद्ध असलेले सोशल मिडिया माध्यम ट्विटरने (Twitter) आता अकाउंटस पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. या पडताळणीनंतर अनेकांच्या खात्यांना ब्लू टिक (Blue Tick) मिळेल. ट्विटरच्या या सार्वजनिक उपक्रमाला काही वर्षांपूर्वी थांबविण्यात आले होते. मात्र मागील वर्षी 2021 मध्ये पुन्हा खात्यांची पडताळणी सुरु केली जाईल असे ट्विटरकडून सांगण्यात आले होते. गुरुवारी कंपनीने सांगितले की, त्यांनी जे ट्विटर खाते पडताळणीच्या नियमांत बसत नसतील त्यांचे स्वत: ब्लू टिक हटविण्यास सुरुवात केली आहे.

ट्विटरने एका ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, "आम्हाला हे सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की, आजपासून आम्ही ट्विटर खात्यांची चाचपणी करणे सुरु केले आहे. यामुळे खात्यांमध्ये पारदर्शिता, विश्वसनीयता आणि स्पष्टता कायम राहिल."हेदेखील वाचा- Internet Explorer Goodbye म्हणणार, माइक्रोसॉफ्ट कंपनीची घोषणा

कंपनीने सांगितले की, 'ट्विटरवर अनेकदा नियमांचे उल्लंघन केले जाते. अशा उल्लंघन करणा-या खात्यांचे ब्लू टिक हटविले जाणार आहे. ब्लू टिक अशा खात्यांना मिळेल ज्यात जनतेना आवड असलेल्या गोष्टींची माहिती दिली जाईल.' ट्विटर खातेदारांनी या गोष्टीची काळजी घ्यावी.

मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर लवकरच आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन फिचरसह येत आहे. याद्वारे, वापरकर्ते त्यांच्या टाइमलाइनवर यूट्यूब व्हिडिओ पाहण्यास सक्षम असतील आणि त्यांना YouTube अॅपवर रीडायरेक्ट केले जाणार नाही. या नवीन फिचरचा वापर करून वापरकर्त्यांना ट्विटरवर व्हिडिओ पाहणे अधिक सुलभ होणार आहे. ट्विटरच्या नवीन फिचरची सध्या अमेरिका, जपान, कॅनडा आणि सौदी अरेबियामध्ये चाचणी घेण्यात येत आहे. आयओएस वापरकर्ते हे फिचर वापरण्यास सक्षम असतील. लवकरचं हे फिचर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल.