Twitter पोस्ट शब्दमर्यादा आता 280 नव्हे 4,000 होणार, सीईओ Elon Musk यांची माहिती
शब्दमर्यादा हे एक त्यातील महत्त्वाचे वैशिष्ट्य. पण आता ट्विटरवरील (Twitter Tweet Word Limit) शब्दमर्यादा वाढविण्यात येणार आहे. ट्विटरचे सीईओ दस्तुरखुद्द एलन मस्क (Elon Musk) यांनीच ही माहिती दिली आहे.
मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर (Micro-blogging Platform Twitter) अनेक कारणांमुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे. शब्दमर्यादा हे एक त्यातील महत्त्वाचे वैशिष्ट्य. पण आता ट्विटरवरील (Twitter Tweet Word Limit) शब्दमर्यादा वाढविण्यात येणार आहे. ट्विटरचे सीईओ दस्तुरखुद्द एलन मस्क (Elon Musk) यांनीच ही माहिती दिली आहे. एलन मस्क (Elon Musk On Tweet Word Limit) यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्विटर (Twitter News) आता ट्विटची 280 शब्दांची मर्यादा दूर करुन ती वाढवत आहे. नव्या बदलानुसार ट्विटरवर तब्बल 4000 शब्दांचे भलामोठा लेखही युजर्सला लिहिता येणार आहे.
किमान शब्दात कमाल आशय
'किमान शब्दात कमाल आशय' हे जणून ट्विटरचे ब्रिदवाक्यच. या मुळेच बहुतांश सर्वसामान्य युजर किंवा नागरिक ट्विटरकडे काहीसे वेगळ्या चष्म्यातून पाहायचे. जगभरातील प्रसिद्ध आणि काही मोजके लोकच ट्विटरवर सराईतपणे वापरायचे. ज्यांना कमी शब्दात जास्त आशय सांगता येत असे तो ट्विटरवर अधिक भाव खावून जात असे. त्यामुळे ट्विटरवर फॉलोअर्स मिळवणे आणि ट्विट लिहिणे ही एक मोठी कसरत असे. (हेही वाचा, Twitter Recommended Features: Elon Musk ने ट्विटरवर जोडले 'हे' खास फिचर; काय आहे खास? जाणून घ्या)
भले मोठे थ्रेड किंवा एकच ट्विट
ट्विटरवर व्यक्त होताना बहुतांश लोक ट्विटर पोस्टच्या शब्दमर्यादेमुळे (280) मोजक्याच शब्दात विषय संपवत असत. ज्यांना हे जमत नसे ते भले मोठे थ्रेड (धागा) लिहीत असत. त्यामुळे ट्विटची संख्याही अधिक होत होती. तसेच, एकच थ्रेड असला तरी त्यातील अनेक थ्रेड युजर्सपणे नेमकेपणाने पोहोचतीलच याची खात्री नसे. कारण प्रत्येक थ्रेड म्हणजे नवे ट्विटच असते.
हॅशटॅग आणि सुसूत्रता
ट्विटरवर हॅशटॅग आणि टॅग करणे हेसुद्धा महत्त्वाचे मानले जात असे. कारण दीर्घ थ्रेड लिहिला आणि त्यात हॅशटॅग वापरला नाही तर संबंधित विषयाचा धागा युजर्सला मिळेलच असे नसे. एलन मस्क यांच्या या नव्या धोरणामुळे यात अधिक सुसूत्रता येण्याची शक्यता आहे. असे असले तरी ट्विटरच्या ट्विटचे रुपांतर फेसबुक सारख्या दीर्घ पोस्टमध्ये होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एलन मस्क यांच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
ट्विट
दरम्यान, आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटरचे म्हणनेअसे की, " Twitter वरील लोकांना सक्षम बनवून एक चांगले माहितीपूर्ण जग निर्माण करणे हे हे ट्विटरचे लक्ष्य आहे. जेणेकरुन ट्विटला अधिक संधर्भ जोडता येतील. ज्यामुळे दिशाभूल करणाऱ्या ट्विटला मर्यादा येतील. ट्विट करताना युजर्स कोणत्याही ट्विटवर नोट्स सोडू शकतात, असेही ट्विटरचे म्हणने आहे.