Twitter ने भारतात लॉन्च केले Voice DMs फिचर; जाणून घ्या खासियत
बुधवार, 17 फेब्रुवारी पासून भारत, ब्राझील आणि जपान मधील युजर्ससाठी हे फिचर सुरु होईल. गेल्या वर्षी कंपनीने व्हाईस ट्विट्स फिचर सुरु केले होते आणि आता युजर्स डायरेक्ट मेसेजच्या माध्यमातून व्हाईस नोट्स पाठवू शकतात.
ट्विटर (Twitter) ने डायरेक्ट मेसेजसाठी नव्या व्हॉईस मेसेजिंग फिचरसाठी (Voice Messaging Feature) टेस्टिंग सुरु केली आहे. बुधवार, 17 फेब्रुवारी पासून भारत, ब्राझील आणि जपान मधील युजर्ससाठी हे फिचर सुरु होईल. गेल्या वर्षी कंपनीने व्हॉईस ट्विट्स फिचर सुरु केले होते आणि आता युजर्स डायरेक्ट मेसेजच्या माध्यमातून व्हॉईस नोट्स पाठवू शकतात. व्हॉईस ट्विटप्रमाणे प्रत्येक व्हॉईस डीएम (Voice DMs) 140 सेकंदाचा असायला हवा. हे टेस्टिंग फिचर अॅनरॉईड (Android) आणि आयओएस (iOS) युजर्ससाठी उपलब्ध असतील.
ट्विटरवर व्हाईस नोट्स DM द्वारे पाठवणे अत्यंत सोपे आहे. यासाठी सर्वप्रथम ट्विटरवर DMs मध्ये एखादे चॅट ओपन करा किंवा नवे चॅट सुरु करा. मेसेज रेकॉर्ड केल्यानंतर एकदा व्हॉईस रेकॉर्डिंग आयकॉनवर टॅप करा आणि रेकॉर्डिंग संपवण्यासाठी तोच आयकॉन पुन्हा एकदा टॅप करा. रेकॉर्ड केलेला मसेज पाठवण्यापूर्वी तुम्ही ऐकू देखील शकता. आयओएस युजर्स साठी थोडी वेगळी पद्धत वापरली जाते. मेसेज रेकॉर्ड करण्यासाठी व्हाईस रेकॉर्डिंग आयकॉन दाबून ठेवा आणि आयकॉन स्वाईपअप करुन सोडून दिल्याने मेसेज पाठवला जाईल. (Fake Accounts वर बंदी घालणे आवश्यक; भारत सरकारची Twitter ला सूचना)
ट्विटरवरील हे डीएम फिचर केवळ अॅनरॉईड किंवा आयओएस युजर्ससाठी सुरु करण्यात आले आहे. परंतु, युजर्स ट्विटरवरील व्हाईस मेसेज वेब ब्राऊजरच्या माध्यमातूनही ऐकू शकतात. या नव्या फिचरमुळे युजर्संना व्यक्त होणे सोपे होईल. तसंच स्टोरीटेलर आणि श्रोतांसाठी एक चांगला अनुभव असेल.