Twitter Subscription: आयफोन युजर्सला आता ट्वीटर वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे, 'ट्विटर ब्लू'साठी iOS वापरकर्त्यांना $8/महिना सबस्क्रिप्शन चार्ज

यापूर्वी ट्वीटर ही मायक्रोब्लॉंगिंग साईट संपूर्ण जगभरात निशुल्क वापरता येत होती पण ट्वीटरचे नवे मालक एलॉन मस्क यासंबंधित एक मोठी घोषणा केली आहे.

Twitter Down | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

गेल्या आठवड्यातचं एलॉन मस्क (Elon Musk) ट्वीटरचे सर्वोसर्वे माल झालेत. तेव्हापासून ट्वीटर या मायक्रोब्लॉगिंग साईटवर (Microblogging Site) मोठे बदल बघायला मिळालेत. ट्वीटरची काही कार्यालये तात्पुरत्या कालावधीसाठी बंद केली जाणार आहे. तर काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यात आले. एलॉन मस्ककडून नोकरीतून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी सर्वाधिक संख्या भारतीय कर्मचाऱ्यांची आहे. एलॉन मस्क यांनी ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांना नोकरीतून काढल्या नंतर पुन्हा एकदा ट्वीटर एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. तुम्ही आयफोन वापरकर्ते (iPhone User) असाल तर हो ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आता आयफओनवर ट्वीटर वापरण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहे. यापूर्वी ट्वीटर ही मायक्रोब्लॉंगिंग साईट संपूर्ण जगभरात निशुल्क वापरता येत होती पण ट्वीटरचे नवे मालक एलॉन मस्क यासंबंधित एक मोठी घोषणा केली आहे.

 

'ट्विटर ब्लू'साठी (Twitter Blue) म्हणजेचं व्हेरिफाईड ट्वीटर अकाउंट (Verified Twitter Account) वापरकर्त्यांना हे अकाउंट वापरण्यासाठी ट्वीटरचं विशेष सबस्क्रीपशन (Subscription) घ्यावं लागणार आहे. तर यासाठी $8/महिना किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे. सध्या भारतीय आयफोन वापरकर्त्यांकडून (Indian Iphone User) हे शुल्क आकारण्यात येण्याबाबत काही घोषणा करण्यात आली नसली तरी अमेरीका (America), कॅनडा (Canada), ऑस्ट्रेलिया (Australia), न्यूझिलंड (New Zealand), ब्रिटन (Britain) यासारख्या देशांमध्ये अॅपल आयफोन वापरकर्त्यांना आता 'ट्विटर ब्लू'साठी सबस्क्रीपशन घ्यावं लागणार आहे. (हे ही वाचा:- Elon Musk: ट्विटरने 7,500 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवे प्रमुख एलन मस्क म्हणतात 'Unfortunately, No Choice')

 

तसेच सध्या तरी अॅनरॉड युजर (Anroid User) कडून सबस्कीपशन चार्ज (Subscription Charge) घेतला जाईल की नाही याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी लवरकच अनरॉइड वापरकर्त्यांना देखील ट्वीटर वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहे हे मात्र निश्चित. तरी भारतातील आयफोन युजर्स कडून देखील ट्वीटर लवकरच सबसक्रीपशन चार्ज आकारणार आहे यांत काहीही शंका नाही. कारण भारत हा देखील सर्वाधिक ट्वीटर वापरणाऱ्या देशांपैकी एक आहे.