Twitter Down Today: ट्विटर डाऊन, जगभरातील युजर्सना लॉग इन करताना अडचणी

ट्विटर डाऊन (Twitter Down Today) झाले आहे. अनेक युजर्सना ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटवर जाताना अडचणी येत आहेत. काही युजर्सना ताज्या अपडेट मिळत नाहीत. तर काही युजर्स ट्विटर किंवा पोस्ट करताना अडचणी येत असल्याचे सांगत आहेत. आम्हीही ट्विटरवर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हालाही ट्विटर उघडताना अडचणींचा सामना करावा लागला

Twitter | (Photo Credit - File Image)

ट्विटर, ही मायक्रो ब्लॉगिंग साईट डाऊन (Twitter Down) झाल्याने जगभरातील युजर्सना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. ट्विटर हा आघाडीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जगभरातील लाखो युजर्स या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. ट्विटर डाऊन (Twitter Down Around the World) झाल्याने जगभरातील युजर्स त्यांचे ट्विटर खाते लॉग इन करु शकले नाहीत. ज्यामुळे त्यांना ट्विट करता अथवा पाहता आले नाही. एलन मस्क (Elon Musk) यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यापासून कर्मचारी कपात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. ट्विटरने जसजशी कर्मचारी कपात सुरु केली. तसतसे ट्विटर डाऊन होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

सोशल मीडियाबद्दल माहिती ठेवणारी आणि त्यांच्या घडामोडींची अद्ययावत माहिती देणाऱ्या डाउन डिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, साधारण दुपारी 3.47 वाजलेपासून ट्विटर डाऊन झाले. ट्विटर एकट्या भारतातच नव्हे तर युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, जपान आणि जगभरातील अनेक देशांतील वापरकर्त्यांकडून ट्विटर डाऊन असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. प्रामुख्याने अॅपच्या तुलनेत डेस्कटॉप आणि मोबाइल आवृत्त्यांवर परिणाम करणारी समस्या व्यापक असल्याचे दिसून आले. (हेही वाचा, Twitter Layoffs: ट्विटरने पुन्हा दिला 50 कर्मचाऱ्यांना नारळ; अंतर्गत खर्चात कपात सुरू असल्याने Elon Musk यांचा निर्णय)

ट्विट

ट्विट

ट्वटिर डाऊन झाल्याची माहिती पुढे येताच अनेक वापरकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ट्विटरची खिल्ली उडवणारी आणि चिमटे काढणारे अनेक मिम्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement