जानेवारी महिन्यापासून टीव्ही, फ्रिजसह अन्य घरगुती सामान महागणार, किंमतीत 10 टक्के वाढ होण्याची शक्यता

नव्या वर्षात म्हणजे जानेवारी महिन्यात एलईडी टीव्ही, फ्रिज आणि वॉशिंग मशीन सारखी अन्य घरगुती सामानांच्या किंमतीत 10 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

Television (Photo Credit: PTI/File)

नव्या वर्षात म्हणजे जानेवारी महिन्यात एलईडी टीव्ही, फ्रिज आणि वॉशिंग मशीन सारखी अन्य घरगुती सामानांच्या किंमतीत 10 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. तांबे, अॅल्युमिनिअम सारख्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ आणि वाहन भाडे महागल्याने त्यांच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच कच्च्या तेलासह प्लास्टिक ही महागेल असून एलजी, पॅनासॉनिक आणि थॉमसन सारख्या कंपन्या जानेवारी महिन्यापासून किंमतीत वाढ करणार आहे. तर सोनी कंपनी या परिस्थिती संदर्भात आढावा घेत असून लवकरच निर्णय जाहीर करणार आहे.

पॅनासॉनिक इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ मनीष शर्मा यांनी असे म्हटले की, आमचे म्हणणे आहे की भविष्यात होणाऱ्या ज्या किंमतीत वाढ होईल त्याचा परिणाम आमच्या किंमतीवर ही होणार आहे. जानेवारीत 6-7 टक्के किंमतीत वाढ आणि आर्थिक वर्षाच्या तिमाहित 10-11 टक्के वाढू शकतात असा अंदाज आहे.(New Rules in 2021: FASTags पासून GST रिटर्न पर्यंत पुढच्या महिन्यात बदलतील अनेक नियम; होणारे नुकसान टाळण्यासाठी आजच घ्या जाणून)

एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया सुद्धा पुढील वर्षात जानेवारी पासून किंमतीत 7-8 टक्के वाढ करणार आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे उपाध्यक्ष विजय बाबू यांनी म्हटले की, जानेवारी महिन्यापासून आम्ही टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स मशीन, फ्रीज सारख्या गोष्टींच्या किंमतीत वाढ करणार आहोत. कच्च्या मालाच्या किंमतीत वेगाने वाढ झाली आहे. त्याचसोबत कच्च्या तेलाच्या किंमती ही वाढल्या आहेत. याच कारणास्तव प्लास्टिकच्या वस्तूंच्या किंमतीवर परिणाम झाला आहे.(LPG / CNG / Auto Gas Cylinder Rate: गॅस सिलिंडर दर प्रत्येक आठवड्याला बदलण्याची शक्यता, तेल कंपन्यांकडू विचार सुरु)

परंतु सोनी इंडियाच्या किंमती वाढवण्याबद्दल आढावा घेतला जात आहे. याबद्दल अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. याबद्दस सोनी इंडियाचे प्रबंध निर्देशक सुनील नय्यर यांनी म्हटले की, सध्या नाही. अद्याप वाट पाहिली जात असून परिस्थितीचा आढावा घेत आहोत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement