Digital Government Directory: सरकार आणि नागरिक यांच्यातील दुवा ठरणार Truecaller डिजिटल गवर्नमेंट डिक्शनरी
ट्रूकॉलरने (Truecaller) सरकारी अधिकाऱ्यांसोबत नागरिकांचा संपर्क अधिक सुलभ व्हावा यासाठी एक सूची प्रकाशित केली आहे. या सूचीला डिजिटल गवर्नमेंट डिक्शनरी ( Digital Government Directory) म्हणून संबोधण्यात आले आहे. ही सूची Truecaller App मध्ये उपलब्ध असणार आहे.
ट्रूकॉलरने (Truecaller) सरकारी अधिकाऱ्यांसोबत नागरिकांचा संपर्क अधिक सुलभ व्हावा यासाठी एक सूची प्रकाशित केली आहे. या सूचीला डिजिटल गवर्नमेंट डिक्शनरी ( Digital Government Directory) म्हणून संबोधण्यात आले आहे. ही सूची Truecaller App मध्ये उपलब्ध असणार आहे. वापरकर्त्यांचे पर्यायाने नागरिकांचे कोणत्याही प्रकारचे घोटाळे, फसवणूक आणि स्पॅमपासून संरक्षण व्हावे तसेच नागरी सेवा अधिक सक्षम व्हाव्यात यासाठी हे महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.
डिजिटल गवर्नमेंट डिक्शनरी Truecaller अॅप वापरकर्त्यांना सर्व केंद्रशासित प्रदेशांसह सुमारे 23 राज्यांमधील हेल्पलाइन, कायदा अंमलबजावणी संस्था, दूतावास, शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि इतर प्रमुख विभागांचे संपर्क देते. सरकारी सूत्रांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. या उपक्रमाचा उद्देश सरकारी प्रतिनिधींपर्यंत नागरिकांना पोहोचता यावे, सामान्यांना मदत मिळावी, कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत व्हावी हा यामागचा उद्देश असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. साधारणपणे 240 दशलक्ष पेक्षा जास्त भारतीय Truecaller वापरकर्त्यांना सरकारशी त्रास-मुक्त पद्धतीने आता जोडून घेता येणार आहे. (हेही वाचा, Truecaller चे नवे फिचर ; असा करा कॉल रेकॉर्ड)
नेटिझन्स आणि अनेक नागरिकांशी बोलल्यानंतर Truecaller ला लक्षात आले की, फोनवरील सर्वात मोठा घोटाळा म्हणजे तोतयागिरीद्वारे होणारी फसवणूक. सरकारी अधिकारी असल्याचे सांगून होणारी सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी पावले उचलणे आवश्यक होती. त्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची योग्य आणि अचूक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे त्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे होते. त्यामुळे ट्रुकॉलरने ही जबाबादीर घेतल्याचे समजते.
दरम्यान, नागरिकांचे तोतयागिरी आणि फसवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी डिजिटल गवर्नमेंट डिक्शनरी काम करेल. आता फोन आला की तुमच्याकडे असलेले Truecaller वापरकर्त्यांना हिरव्या स्क्रिनवर निळ्या रंगाची टीक (ब्लुटीक) दाखवेल. ज्यावरुन तुम्हाला कळेल की संबंधित फोन अधिकृत ठिकाणावरुन आला आहे.
दरम्यान, डिरेक्टरीचा विस्तार करण्यासाठी वेगवेगळ्या सरकारी विभागांसोबत काम Truecaller करत आहे आणि वापरकर्त्यांच्या प्रतिसादाच्या आधारे पुढील टप्प्यात जिल्हा आणि नगरपालिका स्तरावर संपर्क जोडण्याचा विचार करत आहे. Truecaller ने कोणत्याही सरकारी एजन्सीसाठी माहिती सामायिक करण्यासाठी आणि निर्देशिकेवर सत्यापित करण्यासाठी एक सोपी प्रक्रिया देखील तयार केली आहे.

ट्रुकॉलरने अवाहन केले आहे की, आम्ही एक सह-संस्थापक-नेतृत्वाखालील, उद्योजक कंपनी असून, एक अत्यंत अनुभवी व्यवस्थापन संस्था आहोत. Truecaller 8 ऑक्टोबर 2021 पासून Nasdaq Stockholm वर सूचीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी, कृपया www.truecaller.com ला भेट द्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)