Airtel व Vodafone Idea ला TRAI चा झटका; ब्लॉक केले ‘हे’ प्रीमियर प्लान्स, जाणून घ्या कारण

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) ने एक मोठा निर्णय घेत, भारती एअरटेल (Bharti Airtel) चे प्लॅटिनम (Platinum) आणि व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) चे रेडएक्स (RedX) प्रीमियम प्लान्स ब्लॉक केले आहेत,

Vodafone-Idea And Airtel | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) ने एक मोठा निर्णय घेत, भारती एअरटेल (Bharti Airtel) चे प्लॅटिनम (Platinum) आणि व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) चे रेडएक्स (RedX) प्रीमियम प्लान्स ब्लॉक केले आहेत, ज्या अंतर्गत काही निवडक वापरकर्त्यांना वेगवान स्पीड देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सूत्रांनी सांगितले की, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने दोन्ही संचालकांना अंतरिम कालावधीसाठी या विशेष योजना मागे घेण्यास सांगितले आहे. या प्लान्सद्वारे रीचार्ज करणार्‍या वापरकर्त्यांना इतरांपेक्षा अधिक चांगल्या सुविधा देण्यात आल्या होत्या. ट्रायने, प्रीमियम नसलेल्या वापरकर्त्यांच्या सेवेवर याचा परिणाम होऊ शकतो, असे सांगत या योजना बंद केल्या आहेत.

एएनआय ट्वीट -

व्होडाफोन-आयडियाने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, टेलिकॉम ऑपरेटर प्लान रोखल्यामुळे त्यांना धक्का बसला आहे. ट्रायला उत्तर देण्याची संधीही त्यांना दिली गेली नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. आता याचा थेट अर्थ असा आहे की, कोणत्याही प्रकारच्या प्रीमियम सेवा प्लान्स वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नसतील. आता याबाबत आपला पक्ष मांडण्यासाठी ट्रायने एअरटेलला 7 दिवसांचा अवधी दिला आहे. (हेही वाचा: 'टिकटॉक ला पर्याय म्हणून MX Player ने सादर केले 'टकाटक अ‍ॅप'; शॉर्ट व्हिडीओ बनवले झाले सोपे, जाणून घ्या फीचर्सबद्दल)

ट्राय इंडियाच्या वतीने असे म्हटले आहे की अशा प्रकारच्या प्लान्सचा केवळ उर्वरित वापरकर्त्यांसाठी पुरविल्या जाणार्‍या सेवेच्या गुणवत्तेवरच परिणाम होणार नाही, तर नेट न्यूट्रलिटी रूल्स पाळले जाण्यातही अडचण होईल. दोन्ही कंपन्या सार्वजनिक संसाधनांचा (स्पेक्ट्रम) वापर करणार्‍या पब्लिक डेटा हाय-वेवर स्वतंत्र लेन तयार करीत आहेत. अशा प्रकारे श्रीमंत ग्राहकांना उर्वरित कस्टमरपेक्षा चांगल्या सेवा देण्याचे वचन दिले गेले होते.