Toreto: 'ब्लेअर प्रो' वायरलेस ब्लूटुथ हेडसेट केला लाँच
टोरेटो(Toreto) ने आपला नवीन वायरलेस ब्लूटुथ हेडसेट 'ब्लेअर प्रो' (Blair Pro) भारतीय बाजारात लाँच केला
अत्याधुनिक तसेच पोर्टेबल डिजिटल प्रॉडक्ट बाजारातील अग्रगण्य कंपनी टोरेटो(Toreto) ने आपला नवीन वायरलेस ब्लूटुथ हेडसेट 'ब्लेअर प्रो' (Blair Pro) भारतीय बाजारात लाँच केला. ह्याची किंमत 2999 रुपये इतकी आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, टोरेटो ब्लेअर प्रो हा आधीच्या टोरेटो ब्लेअरचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. मागच्या व्हर्जनच्या तुलनेत ह्यात बरेच नवीन फीचर्स जोडले गेले आहेत. टोरेटो ब्लेअर प्रो मधून सदाबहार गाण्यांचा अद्भूत अनुभव मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
टोरेटो ब्लेअर ठळक वैशिष्ट्ये:
हे स्टाईल आणि टेक्नोलॉजीचे अफलातून मिश्रण आहे. सलग 7 तास आपण आपली आवडती गाणी ह्यावर ऐकू शकता. व्यायाम करतानाही गाणी ऐकण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
ह्याची सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे हा ब्लूटुथ एकाच वेळी 2 मोबाईल्सला आपण कनेक्ट करतो येतो. तसेच आपल्या डिवाइस सोबत गुगलच्या माध्यमातून ब्राउज करण्याचेही आपल्याला स्वातंत्र्य आहे. तुम्ही ह्यात लावलेल्या मायक्रोफोनच्या आधारे गुगलवर ब्राउजिंग करु शकता. तसेच व्हॉईस बटनाच्या माध्यमातून आपण ज्याला हवा त्याला कॉल करु शकता. तसेच संबंधित व्यक्तीचे केवळ नाव घेऊन आपण त्याला कॉल लावू शकता.
ब्लेअर प्रो मध्ये मॅगनेटिक इयरबर्ड्स आहेत. जेव्हा ते वापरात नसतील, तेव्हा ते एकमेकांना चिकटलेले असतात. हे हेडसेट्स 10 मीटरच्या अंतरावरुनही खूप उत्कृष्टरित्या काम करतात. तसेच हा ब्लेअर प्रो कोणत्याही स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉप्सला कनेक्ट होऊ शकतो.
ह्या ब्लूटुथमध्ये 160mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ज्याने 2.5 तासांच्या चार्जिंगने आपण सलग 7 तास आपली आवडती गाणी ऐकू शकता. तसेच ह्यात 120 तासांचा स्टँडबाय टाईम आणि 8 तासांचा टॉकटाईम देण्यात आला आहे.
आता गिफ्ट देऊ शकता ही 2 हजार पेक्षा कमी किमतीची हटके गॅजेट्स
टोरेटो ब्लेअर प्रो काळ्या आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे. ह्याची किंमत 2999 रुपये आहे. हा ब्लूटुथ आपल्याला सर्व रिटेल स्टोअर्स आणि ईकॉमर्स साइट्सवर उपलब्ध आहे. हे ब्लूटुथ 1 वर्षाच्या वॉरंटीसह मिळतो.