Tokyo Olympics 2020 Athletes in 3D: PV Sindhu, Simone Biles’ सह निवडक ऑलंपिक खेळाडूंना त्यांच्या स्किल मध्ये 3D With Google AR मध्ये कसं पहाल?

सध्या गूगलने जारी केलेल्या या फीचर मध्ये पीव्ही सिंधू सोबत American gymnast Simone Biles, USA football player Megan Rapinoe आणि tennis player Naomi Osaka या निवडक खेळाडूंना पाहता येईल.

Tokyo Olympics 2020 Athletes in 3D (Photo Credits: Google)

Tokyo Olympic Games 2020 ची धूम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदा कोरोना संकटामुळे ऑलंपिक गेम्स वर्षभर उशिराने होत असले तरीही जगभरातील क्रीडाप्रेमी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंचे परफॉर्मन्स पाहण्यासाठी उत्सुक आहेत. यंदा तुम्ही पी व्ही सिंधूचं (PV Sindhu) कसब किंवा Simone Biles चे ट्रिपल डबल्स थ्री डी (3D) मध्ये देखील पाहू शकणार आहात. गूगल (Google) या अग्रगण्य सर्च इंजिनकडून आता काही निवडक खेळाडूंचे थ्रीडी मध्ये पाहण्यासाठी खास फीचर लॉन्च केले आहे. गूगल कडून या वर्षीच्या सुरूवातीला I/O feature लॉन्च करण्यात आले आहे. आता ते AR (Augmented Reality) देखील सपोर्ट करते. यामध्ये आता काही खेळाडू देखील पाहता येणार आहे. भारताची बॅटमिंटन स्टार PV Sindhu आणि American Gymnast Simone Biles यांचा त्यामध्ये समावेश आहे.

सध्या गूगलने जारी केलेल्या या फीचर मध्ये पीव्ही सिंधू सोबत American gymnast Simone Biles, USA football player Megan Rapinoe आणि tennis player Naomi Osaka या निवडक खेळाडूंना पाहता येईल. AR athlete feature मुळे रिअल टाईम मध्ये आणि तुम्हांला तुमच्या सोयी नुसार बॅकग्राऊंड निवडून खेळाडूंच्या खास स्टाईल्स पाहता येणार आहेत. Team India Cheer Song: ए आर रहमान आणि अनन्या बिर्ला यांचे Hindustani Way गाणे रिलीज; Tokyo Olympics मधील भारतीय खेळाडूंना समर्पित (Watch Video).

PV Sindhu आणि American Gymnast Simone Biles चं कसब 3D With Google AR मध्ये कसं पहायचं?

Simone Biles (Photo Credits: Google)
PV Sindhu (Photo Credits: Google)

काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे लॉकडाऊनच्या काळात प्राणी थ्रीडी मध्ये लॉन्च करण्यात आले होते. त्याला तुफान लोकप्रियता देखील मिळाली होती. प्राण्यांना तुम्हांला हलवता येऊ शकत नव्हते पण आता लॉन्च करण्यात आलेल्या अ‍ॅथलीट्सच्या सीरीज मध्ये फ्लॅट सरफेस वर त्यांना अ‍ॅक्शन मध्ये हलवण्याचा पर्याय आहे.