फोन चार्ज करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या !

यामुळे फोनचे नुकसान होतेच पण त्याचबरोबर जीवालाही धोका निर्माण होतो.

फोन चार्जिंग (Photo Credit : Pixabay)

स्मार्टफोन ब्लास्ट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे फोनचे नुकसान होतेच पण त्याचबरोबर जीवालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे फोन चार्जिंगला लावताना नेमकी काय काळजी घ्यावी, हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी काही खास टिप्स...

- स्मार्टफोन ब्लास्ट होण्याचे सर्वात मोठे कारण आहे ओव्हरचार्जिंग. अनेक लोक रात्री झोपताना फोन चार्जिंगला लावतात. तुम्हालाही ही सवय असल्यास ती भयंकर ठरु शकते. त्यामुळे फोनची बॅटरी ओव्हरहिट होऊ शकते. यामुळे बॅटरी लाईफ कमी होते. म्हणूनच फोन चार्ज झाल्यानंतर चार्जर लगेचच अनप्लग करा.

- फोन चार्ज करताना स्मार्टफोनवर कोणतीही वस्तू ठेवू नका. अनेक लोक फोन चार्जिंगला लावून उशीखाली ठेवतात. असे केल्याने फोन ओव्हरहीट होऊ शकतो.

- फोन चार्जिंगला लावून त्यावर गेम खेळू नका. त्याचबरोबर फोन चार्जिंगला लावून त्यावर सिनेमा किंवा व्हिडिओज पाहणं टाळा. यामुळे फोनच्या बॅटरीचे तापमान वाढेल. त्याचबरोबर फोन चार्जिंगला लावलेला असताना ईअरफोनचा वापर टाळावा.

- फोन चार्जिंगला लावलेला असताना फोन रिसिव्ह करुन बोलत बसू नका. त्याचबरोबर फोन एक्सटेन्शन कॉर्ड्ससोबत चार्ज करु नका. कारण कोणत्याही कॉडचे सॉकेट खराब असल्यास त्याचा थेट परिणाम स्मार्टफोनवर होऊ शकतो.

-फोन चार्ज करताना उन्हात ठेवू नका. त्याचबरोबर इतर उष्णतेच्या ठिकाणी म्हणजेच कारच्या डॅशबोर्डवर किंवा इतर ठिकाणी ठेवू नका. यामुळे फोनमध्ये हिटींगची समस्या उद्भवू शकते.

- फोन चार्ज करताना फोनचे बॅक कव्हर काढून ठेवा. त्याचबरोबर फोन नेहमी ओरिजनल चार्जरने चार्ज करा.

- ज्याप्रमाणे ओरिजनल चार्जर महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर ओरिजनल बॅटरी असणेही गरजेचे असते. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या.



संबंधित बातम्या