IPL Auction 2025 Live

लॅपटॉपचा स्पीड वाढवण्यासाठी खास '४' टिप्स !

जुना लॅपटॉप नव्या सारखा होण्यासाठी या चार टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील....

लॅपटॉप (Photo Credits: Unsplash.com)

तुमचा लॅपटॉप जुना किंवा खराब झाल्याय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो बदलण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष द्या. लॅपटॉपमधील एखादा पार्ट बदलल्यास तो पुन्हा नव्या सारखा होऊ शकेल का?

काही गरजेचे बदल केल्यास लॅपटॉपचा स्पीड वाढवता येईल. जुना लॅपटॉप नव्या सारखा होण्यासाठी या चार टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील....

हार्डवेअर अपडेट

खरंतर लॅपटॉपची रॅम, स्टोरेज, बॅटरी किंवा मग ग्राफिक्समध्ये काही प्रॉब्लेम असल्यास नवीन लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी त्याचे पार्ट बदलून जुन्या लॅपटॉपचा वापर करु शकता. उदा. जर तुम्ही डिझाईनिंगचे काम करत असाल तर ग्राफिक्स आणि रॅमला अपग्रेड करुन तुमचे काम सोपे होऊ शकते.

व्हायरस

लॅपटॉप स्लो होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे व्हायरस. दिवसभरात आपण अनेक वेबसाईट्स सर्च करतो. त्यामुळे व्हायरस ऑनलाईन आपल्या सिस्टममध्ये जातो. याशिवाय पेन ड्राईव्ह, डार्ड डिस्क किंवा स्मार्टफोन लॅपटॉपला कनेक्ट केला जातो. यातूनही व्हायरस सिस्टममध्ये प्रवेश करतो. त्यामुळे लॅपटॉप लवकर गरम होतो आणि स्लो काम करु लागतो. अशावेळी सिस्टममध्ये अॅंटीव्हायरस डाऊनलोड करा आणि सर्वात आधी Boot Scan करा. यामुळे पूर्ण सिस्टम स्कॅन होते. करप्ट फाईन रिपेअर होते किंवा डिलीट होते. त्यानंतर नवा लॅपटॉपही नव्यासारखा काम करु लागेल.

हार्ड वेअर

लॅपटॉपमध्ये अधिक स्टोरेजमुळे लॅपटॉपचा स्पीड स्लो होतो. अशातच जर लॅपटॉपचा स्टोरेज फुल झाला असेल तर बिनकामाच्या फाईल्स तुम्ही डिलीट करु शकता. किंवा डेटा एक्सटर्नल डिक्स किंवा क्लाऊड सर्व्हरवर स्टोर करु शकता.

सॉफ्टवेअर

अनेकदा सिस्टममध्ये असलेले जुने सॉफ्टवेअर जर तुम्ही वापरत नसाल तर तते डिलीट करा. कारण त्यामुळेही लॅपटॉप स्लो होतो. याशिवाय लॅपटॉपचे सॉफ्टवेअर नियमित अपडेट करत राहा.