TikTok Layoffs: टिकटॉक कंपनीमध्ये टाळेबंदीची घोषणा; 1,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी - रिपोर्ट

एका अहवालानुसार, कंपनीत सुमारे 1,000 कर्मचारी कपात करण्यात येणार आहे.

TikTok (PC - pixabay)

TikTok Layoffs: ByteDance, चिनी शॉर्ट व्हिडिओ ॲप TikTok ची मूळ कंपनी ByteDance जागतिक स्तरावर आपल्या काही कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहे. एका अहवालानुसार, कंपनीत सुमारे 1,000 कर्मचारी कपात करण्यात येणार आहे. कंपनी खर्च कमी करण्यासाठी वापरकर्ते ऑपरेशन्स आणि कम्युनिकेशन डिपार्टमेंटमधील जागतिक टीममध्ये कर्मचारी कपात करणार आहे. टाळेबंदीनंतर, उर्वरित काही सदस्यांना कंपनीच्या ट्रस्ट आणि सेफ्टी, कंटेंट मार्केटिंग आणि प्रॉडक्ट टीम्सच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत. (हेही वाचा:Tesla Layoffs: टेस्ला टाळेबंदी, कंपनीच्या पुनर्रचनेत हजारो कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या)

यापूर्वी एप्रिल 2024 मध्ये, आयर्लंडमधील 250 कर्मचाऱ्यांना टिकटॉकच्या टाळेबंदीचा फटका बसला होता. तथापि, टिकटॉक अजूनही आयर्लंडमध्ये पुन्हा कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देण्याची शक्यता आहे. कारण तो हा देश टिकटॉक च्या कमाईसाठी महत्त्वाचा मानत आहे.

मेटा, गुगल, ॲमेझॉन, पेटीएम यांच्यानंतर टेक उद्योगातील महत्त्वपूर्ण टाळेबंदीची घोषणा करणारी टिकटॉक ही पुढची आहे. मिळालेल्या माहितीनुसार TikTok मधील कर्मचाऱ्यांनी सांगितले की कंपनी ऑपरेशन्स आणि मार्केटिंगमधून लक्षणीय टाळेबंदी जाहीर करण्याची योजना आखत आहे. दरम्यान, एकूण किती कर्मचाऱ्यांना कंपनी काढेल याची नेमकी संख्या कळू शकली नाही, मात्र, ही संख्या 1,000 पर्यंत असू शकतेअसे अहवालात म्हटले आहे. TikTok ग्लोबल ऑपरेशन्स टीम युजर सपोर्ट, यूजर कम्युनिकेशन्स आणि इतर ऑपरेशन्स हाताळते. (हेही वाचा :Whirlpool Layoffs 2024: व्हर्लपूलमध्ये कर्मचारी कपात, जगभरातील 1,000 कर्मचारी गमावणार नोकऱ्या )