Year Ender 2023: यावर्षी भारतीयांनी गुगलवर मोठ्या प्रमाणावर सर्च केले 'हे' विषय; वाचा संपूर्ण यादी
नुकतीच, गुगलने इयर एंडरच्या संदर्भात एक यादी जारी केली आहे. ज्यामध्ये 2023 मध्ये गुगलवर कोणते विषय सर्वात जास्त शोधले गेले हे सांगण्यात आले आहे.
Top Trending Searches in India 2023: चालू वर्ष 2023 वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. यंदा इयर एंडर (Year Ender 2023) गोष्टींची बरीच चर्चा आहे. या वर्षी कोणते विषय सर्वाधिक शोधले गेले, कोणते व्हिडिओ पाहिले गेले, कोणते अॅप वापरले गेले, वर्षातील सर्वात महाग उत्पादन, वर्षातील ट्रेंडिंग विषय इत्यादी जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. नुकतीच, गुगलने इयर एंडरच्या संदर्भात (Google Top Searches) एक यादी जारी केली आहे. ज्यामध्ये 2023 मध्ये गुगलवर कोणते विषय सर्वात जास्त शोधले गेले हे सांगण्यात आले आहे.
2023 हे वर्ष अनेक अर्थांनी खूप खास होते. तंत्रज्ञानापासून राजकारणापर्यंत अनेक क्षेत्रांत मोठे बदल झाले. चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग असो किंवा G20 सारख्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन असो. या सर्व घटनांनी जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले. यंदा भारतीय युजर्सनी गुगलवर क्रिकेट वर्ल्ड कप हा विषय मोठ्या प्रमाणात सर्च केला. (हेही वाचा -Year Ender 2023: टीम इंडियाच्या या दिग्गज खेळाडूंनी यावर्षी केले लग्न, येथे पाहा संपूर्ण यादी)
2023 मधील बातम्यांच्या इव्हेंट टॉप 5 सर्च -
- Chandrayaan-3
- Karnataka Election Result
- Israel News
- Satish Kaushik
- Budget 2023
2023 मधील What is चे टॉप 5 सर्च -
- What is G20
- UCC Kya hai (What is UCC)
- What is Chat GPT
- Hamas Kya hai (What is Hamas)
- 28 Sep 2023 ko kya hai (What is on 28 Sep 2023)
2023 मध्ये How To चे टॉप 5 सर्च -
- How to prevent Sun Damage for Skin And Hair with Home remedies
- How to Reach my First 5K Followers on Youtube
- How to get Good at kabaddi
- How to improve car mileage
- How to Become a Chess Grandmaster
2023 मध्ये भारतातील स्पोर्ट्ससंदर्भातील टॉप 5 सर्च -
- Indian Premier League
- Cricket World cup
- Asia Cup
- Women's Premier League
- Asian Games
2023 मधील Near Me चे टॉप 5 सर्च -
- Coding Classes Near Me
- Earthquake Near me
- Zudio Near me
- Onam Sadhya Near me
- Jailer Movie Near me
गुगलने 2023 मध्ये भारतातील टॉप ट्रेंडिंग सर्चच्या एकूण 12 याद्या जारी केल्या आहेत. या यादीमध्ये न्यूज इव्हेंट, हाऊ टू, व्हॉट इज, नियर मी, स्पोर्ट इव्हेंट्सच्या टॉप सर्चची माहिती दिली आहे.