लवकरच मोबाईलमधून गायब होतील हे महत्वाचे फिचर्स

अशा 5 महत्वाच्या उपयोगी अॅक्सेसरीज ज्या लवकरच तुमच्या फोनमधून निघून जातील.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

सध्या मोबाईलविश्वात आश्चर्यजनक क्रांती घडत आहे. लोकांना मोबाईलचा वापर करणे अजून सोपे व्हावे यासाठी, दिवसागणिक मोबाईलच्या फिचर्समध्ये अनके बदल घडत आहेत. म्हणूनच येणाऱ्या काही वर्षांत मोबाईल कंपन्या सध्या उपलब्ध असलेले काही फिचर्स किंवा अॅक्सेसरीज काढून टाकण्याच्या मार्गावर आहेत. चला तर पाहूया अशा कोणत्या 5 महत्वाच्या उपयोगी अॅक्सेसरीज आहेत ज्या लवकरच तुमच्या फोनमधून निघून जातील.

> इ-सिम – मोबाईलमधून निघून जाणाऱ्या गोष्टींपैकी सिमकार्ड ही फार महत्वाची गोष्ट असणार आहे. होय, आता इथूनपुढे मोबाईलमध्ये फिजिकल सिमकार्डची गरज भासणार नाही. कारण हे काम सॉफ्टवेअरद्वारे होणार आहे. सध्या हे तंत्रज्ञान फक्त आयफोनमध्ये दिसून येत आहे, मात्र येत्या काही वर्षांत इतर सर्व फोन्समध्ये सुद्धा सिम कार्डसाठी हेच तंत्रज्ञान वापरण्यात येईल. हे तंत्रज्ञान केवळ सॉफ्टवेअरद्वारे कार्य करणार असल्याने, आपल्या स्मार्टफोनला सिम कार्ड स्लॉटची आवश्यकता भासणार नाही.

> फिंगर प्रिंट स्कॅनर – सध्या जवळजवळ सर्वच फोनमध्ये हे फिचर दिसून येते. लॉक झालेला फोन अनलॉक करण्यासाठी हे फिचर वापरले जाते. मात्र हे फिचर पुढील काळात गायब होऊ शकते. या ऐवजी आता इनडिस्प्ले फिंगर प्रिंट स्कॅनर जरी आलेले असले तरी, ते पुढील काही काळच राहणार आहे. यानंतर मोबाईल सुरक्षेसाठी केवळ फेस आयडी सिक्युरिटीच राहणार आहे. आयफोनने नुकत्याच लाँच केलेल्या फोनमध्ये फिंगर प्रिंट स्कॅनर गायब झाला आहे.

> मोबाईल चार्जर – अनेक मोबाईल कंपन्यांनी अतिशय कमी वेळात चार्ज होणारे फोन्स बाजारात आणले आहेत. सध्या मोबाईलचे चार्जिंग फास्ट होत असले तरी, चार्जरची वायर ही एक कटकटच ठरते. म्हणूनच मोबाईल कंपन्या आता येणाऱ्या फोन्सममध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा देणार आहेत.

> मेमरी कार्ड – सुरुवातीपासूनच मेमरी कार्ड हा फोनचा अविभाज्य घटक राहिला आहे. मोबाईलची मेमरी वाढवण्यासाठी बाहेरून एसडी कार्डच्याद्वारे मोबाईलची मेमरी वाढवू शकतो. मात्र एसडी कार्डमुळे फोनचा परफॉर्मन्स कमी होत असल्याने, आता कंपन्या मायक्रो एसडी कार्डऐवजी फोनमधील इनबिल्ट मेमरीच वाढवण्याच्या मार्गावार आहेत.

> हेडफोन – फोनसोबत हेडफोन हे एक समीकरणच बनलेले आहे. मात्र आता येणाऱ्या फोन्समध्ये हेडफोनचे जॅक असणार नाही. याची जागा घेणार आहे वायरलेस हेडफोन. येणाऱ्या नव्या नव्या OnePlus 6Tमध्ये वायरलेस हेडफोन्स असणार आहेत.