प्रतीक्षा संपली, OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro भारतामध्ये लॉन्च; जाणून घ्या फीचर्स, स्पेसिफिकेशन व किंमत
हँडसेट निर्माता कंपनी वनप्लसने (OnePlus) आपल्या ग्राहकांसाठी नवीन वनप्लस 9 सिरीज बाजारात आणली आहे. या नवीन सिरीजमध्ये वनप्लस 9 (OnePlus 9), वनप्लस 9 प्रो (OnePlus 9 Pro) आणि वनप्लस 9 आर (OnePlus 9 R) लाँच केले गेले आहेत. गेले अनेक दिवस या फोन्सची आतुरतेने वाट पहिली गेली होती
हँडसेट निर्माता कंपनी वनप्लसने (OnePlus) आपल्या ग्राहकांसाठी नवीन वनप्लस 9 सिरीज बाजारात आणली आहे. या नवीन सिरीजमध्ये वनप्लस 9 (OnePlus 9), वनप्लस 9 प्रो (OnePlus 9 Pro) आणि वनप्लस 9 आर (OnePlus 9 R) लाँच केले गेले आहेत. गेले अनेक दिवस या फोन्सची आतुरतेने वाट पहिली गेली होती. कॅमेरा हे या फोनचे महत्वाचे फिचर आहे, त्याविषयी बोलायचे तर, वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रो स्मार्टफोन ग्राहकांना उत्कृष्ट कॅमेरा अनुभव देण्यासाठी कंपनीने या वेळी Hasselblad शी हातमिळवणी केली आहे. मागील वनप्लस स्मार्टफोनप्रमाणेच या फोनलाही कर्व्ड डिझाईन मिळेल आणि बाजूला अॅल्युमिनियम फ्रेमही आहे.
वनप्लस 9 फिचर व किंमत -
हा फोन Android 11 वर आधारित ऑक्सिजन ओएस 11 वर कार्य करतो. वनप्लस 9 मध्ये 6.55 इंचाचा फुल-एचडी + (1,080x2,400 पिक्सल) फ्लूईड एमोलेड डिस्प्ले आहे. वनप्लस 9 मध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी कंपनीने स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर वापरला आहे, फोनमध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256 जीबीपर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढविणे शक्य नाही. फोनमध्ये वनप्लस कूल प्ले नावाची मल्टी-लेयर कूलिंग सिस्टम आहे.
वनप्लस 9 च्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. 48 मेगापिक्सलचा Sony IMX689 प्रायमरी कॅमेरा सेन्सर, अपर्चर एफ / 1.8 आहे, 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा Sony IMX766 सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम कॅमेरा सेन्सर आहे. व्हिडिओबद्दल बोलायचे तर, फोन 30fps वर 8K व्हिडिओ शूट करण्यास सक्षम आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी अपर्चर एफ / 2.4 सोबत 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.
फोनमध्ये 4 जी एलटीई, 5 जी, ब्लूटूथ व्हर्जन 4.2, जीपीएस, ए-जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी फोनला इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. फोनमध्ये डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स दिले आहेत.
कंपनीने आपल्या या लेटेस्ट स्मार्टफोनचे Winter Mist, Astral Black आणि Arctic Sky असे तीन कलर व्हेरिएंट बाजारात आणले आहेत. वनप्लस 9 स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम / 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे, तर फोनच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅम / 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मॉडेलची किंमत 54,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
वनप्लस 9 प्रो फीचर व किंमत -
वनप्लस 9 प्रो स्मार्टफोन Android 11 वर आधारित ऑक्सिजन ओएस 11 वर कार्य करतो. फोनमध्ये 6.7 इंचाची क्वाडएचडी + (1,440x3,216 पिक्सेल) फ्लूइड डिस्प्ले 2.0 एमोलेड डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी वनप्लस 9 प्रो स्मार्टफोनमध्ये, स्नॅपड्रॅगन 888 5 जी प्रोसेसर वापरला गेला आहे. फोनमध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256 जीबी पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढविणे शक्य नाही.
वनप्लस 9 प्रो च्या मागील पॅनेलमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 48MP Sony IMX789 प्रायमरी कॅमेरा सेन्सर, अपर्चर एफ / 1.8, 50MP Sony IMX766 सेकंडरी कॅमेरा सेन्सर आहे, जो अल्ट्रा-वाइड फ्रीफॉर्म लेन्ससह येतो. फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा मोनोक्रोम कॅमेरा सेन्सर देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी कंपनीने 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला आहे. व्हिडिओबद्दल बोलल्यास, फोन 330fps वर 8K व्हिडिओ शूट करण्यास सक्षम आहे, इतकेच नाही तर फोन 120fps वर 4 K व्हिडिओ देखील शूट करू शकेल. नाईटस्केप व्हिडिओ 2.0 फीचरही फोनमध्ये दिसणार आहे. (हेही वाचा: 48 मेगापिक्सल कॅमेरा, 5 हजार बॅटरी क्षमतेसह जबरदस्त फिचर्स असलेला Redmi Note 10 पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध)
कंपनीने आपले लेटेस्ट फोन Morning Mist, Pine Gren आणि Stellar Black अशा रंगत बाजारात आणले आहेत. वनप्लस 9 प्रो स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम / 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 64,999 रुपये आहे आणि 12 जीबी रॅम / 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 69,999 रुपये आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)