Telegram EvilVideo Malware Alert: टेलिग्रामवरून चित्रपट-व्हिडिओ डाउनलोड करणे पडू शकते महागात; मोबाईलमध्ये प्रवेश करू शकते 'इव्हलव्हिडिओ' मालवेअर, हॅकर्सपासून रक्षण करण्यासाठी काही टिप्स

टेलीग्रामच्या डीफॉल्ट सेटिंग्जमध्ये, जेव्हा तुम्ही चॅट उघडता तेव्हा या फाइल्स आपोआप डाउनलोड होत होत्या.

Hacker Representational Image, Person Using Telegram in Smartphone (Photo Credit: Pexels)

Telegram EvilVideo Malware Alert: तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल आणि त्यामध्ये टेलिग्राम ॲप (Telegram App) वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अलीकडेच टेलीग्रामच्या अँड्रॉइड आवृत्तीमध्ये एक मोठी सुरक्षा त्रुटी असल्याचे समोर आले होते. याचे नाव इव्हलव्हिडिओ (EvilVideo) असून, ज्याद्वारे हॅकर्सना चॅट्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांना हानिकारक फाइल्स पाठवण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर हॅकर्सनी युजर्सना व्हिडिओ फाइल्ससारखे दिसणारे धोकादायक मालवेअर पाठवले. टेलिग्राम आवृत्ती 10.14.15 मध्ये ‘इव्हलव्हिडिओ’ सुरक्षा त्रुटी दिसून आली.

या त्रुटीद्वारे, हॅकर्सनी खास तयार केलेल्या एपीके फाइल्स व्हिडिओ फाइल्सच्या रूपात युजर्सना पाठवल्या. टेलीग्रामच्या डीफॉल्ट सेटिंग्जमध्ये, जेव्हा तुम्ही चॅट उघडता तेव्हा या फाइल्स आपोआप डाउनलोड होत होत्या. जर तुम्ही चुकून अशी फाईल उघडली, तर तुमच्या फोनवर वाईट परिणाम होऊ शकतो. हा मालवेअर तुमची खाजगी माहिती चोरू शकतो किंवा तुमच्या फोनचा ताबा देखील घेऊ शकतो.

मात्र, घाबरण्याची गरज नाही. टेलीग्रामला जूनमध्ये या त्रुटीची जाणीव झाली आणि जुलैमध्ये अपडेट जारी करून त्याचे निराकरण केले. जर तुम्ही अजून टेलीग्राम अपडेट केले नसेल तर ते लवकर अपडेट करा. परंतु, अनेक वापरकर्त्यांना अशा मालवेअरपासून त्यांच्या स्मार्टफोनचे संरक्षण कसे करावे हे माहित नसल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. (हेही वाचा: Whatsapp New Feature: व्हॉट्सॲप नवीन फीचर लॉंच करण्याच्या तयारीत; इंटरनेटशिवायही मोठमोठ्या फाइल्स शेअर करता येणार)

जाणून घ्या तुमच्या मोबाईल फोनचे इव्हलव्हिडिओ सारख्या मालवेअरपासून कसे संरक्षण कराल-

अशाप्रकारे थोड्या सावधगिरीने, तुम्ही टेलीग्रामवर सुरक्षित राहू शकता आणि चॅटचा आनंद घेऊ शकता.