टेलिकॉम कंपन्यांचे 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत बेस्ट प्रीपेड प्लॅन, जाणून घ्या
जिओचे नवे प्लॅन आजपासून लागू होणार आहेत.
रिलयान्स जिओने (Reliance Jio) बुधवारी त्यांच्या ऑल-इन-वन प्रीपेड प्लान्सबाबत अधिक माहिती देत 300 टक्के अधिक बेनिफिट्स देणार असल्याचे स्पष्ट केले. जिओचे नवे प्लॅन आजपासून लागू होणार आहेत. तर एअरटेल (Airtel) आणि वोडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) यांनी त्यांचे नवे टॅरिफिक प्लॅन 3 डिसेंबरपासून लागू केले आहेत. त्यानुसार कंपन्यांनी त्यांच्या जुन्या प्रीपेड प्लॅनचे दर वाढवले आहेत. तसेच त्या प्लॅनमधील बेनिफिट्स मध्ये ही कपात केली आहे. मात्र एअरेटल, वोडाफोन-आयडिया आणि जिओ यांचे असे काही प्लॅन आहेत त्यामधून युजर्सला बेस्ट प्रीपेड प्लॅन 200 रुपयांपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
तर एअरटेल कंपनीचा 148 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला 28 दिवसांची वॅलिडिटी मिळणार आहे. तसेच एकूण 2 जीबी डेटा आणि 1000 एफयुपी मिनिट्स (अन्य नेटवर्कवर कॉलिंग) मिळणार आहेत. तसेच वोडाफोनचा 149 रुपयांच्या प्लॅन हा सर्वात स्वस्त असून ग्राहकाला 2 जीबी डेटा आणि 1000 एफयुपी मिनिट्स मिळणार आहेत. रिलायन्स जिओचा 129 रुपयांच्या प्लॅन घेतल्यास यामध्ये 2 जीबी डेटा आणि 1000 एफयुपी मिनिट्स देण्यात येणार आहेत. त्याचसोबत एअरटेलचा 148 आणि वोडाफोनचा 149 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनपेक्षा ग्राहकांना जिओचा हा प्लॅन घेतल्यास 15 टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे.(एअरटेल ग्राहकांसाठी खुशखबर! Voice over Wi Fi च्या साहाय्याने नेटवर्कशिवाय करता येणार कॉल)