TCS To Hire 40,000 Freshers: आयटी फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी; टीसीएस करणार तब्बल चाळीस हजार कर्मचाऱ्यांची भरती

तंत्रज्ञानातील बदलांमुळे नोकरीच्या बाजारपेठेतही बदल झाला आहे.

TCS | (Photo Credit- Wikimedia Commons)

TCS To Hire 40,000 Freshers: देशातील सर्वात मोठी आयटी सेवा पुरवठादार (IT Service Provider) कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) चालू आर्थिक वर्षात हजारो फ्रेशर्सना नोकऱ्या देणार आहे. देश आणि जगाचे आयटी क्षेत्र महत्त्वपूर्ण बदलांमधून जात असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. अहवालानुसार कंपनी तब्बल 40,000 फ्रेशर्सना नोकऱ्या देणार आहे. याआधी, जूनच्या तिमाहीत म्हणजेच तीन महिन्यांत कंपनीने 5000 हून अधिक लोकांना नोकऱ्या देऊन कर्मचारी वाढवले ​​होते. आता कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 606,998 वर पोहोचली आहे.

टीसीएसची ही नोकर भरतीची घोषणा देशातील तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. टीसीएसने हा निर्णय अशा वेळी घेतला आहे जेव्हा देशातील तरुणांमध्ये बेरोजगारीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. तज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत देशातील इतर आयटी कंपन्याही फ्रेशर्सना नोकऱ्यांची घोषणा करू शकतात.

गेल्या एक वर्षापासून आयटी क्षेत्राला मंदीच्या झळा बसत आहेत. त्यामुळे नोकऱ्यांवरही विपरीत परिणाम झाला आहे. भारतासह जगभरात 2 लाखांहून अधिक लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. आयटी क्षेत्रातील सध्या सुरू असलेल्या टाळेबंदीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) नेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीने या वातावरणातही नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना मोठा दिलासा दिला आहे. टीसीएसच्या म्हणण्यानुसार, या आर्थिक वर्षाच्या अखेरीस त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 6.5 लाख असेल. (हेही वाचा: Zomato Founder-CEO Joins Billionaire Club: झोमॅटोचे संस्थापक दीपंदर गोयल अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सामील; भारतातील सर्वात श्रीमंत व्यवस्थापक बनले)

टीसीएस चीफ एचआर ऑफिसर मिलिंग लक्कड यांच्या मते, एआयच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी तरुणांना तयार राहावे लागेल. तंत्रज्ञानातील बदलांमुळे नोकरीच्या बाजारपेठेतही बदल झाला आहे. याला तोंड देण्यासाठी टीसीएस तयारी करत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, जे चांगले काम करतात त्यांना कंपनीने 10 ते 12 टक्के वेतनवाढ दिली आहे. याशिवाय इतर लोकांनाही 4.5 ते 7 टक्के वेतनवाढ देण्यात आली आहे. कंपनीने 4 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना एआय प्रशिक्षण दिले आहे. याशिवाय कंपनीतर्फे चालवल्या जाणाऱ्या इतर प्रशिक्षण कार्यक्रमांचाही कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला आहे. तसेच, कंपनीचे सुमारे 70 टक्के कर्मचारी आता कार्यालयातून काम करत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif