TCS ला अमेरिकन फेडरल कोर्टाचा मोठा झटका; 1800 कोटी देण्याचे आदेश

टीसीएसने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की या प्रकरणावर आता न्यायालय निर्णय घेईल. न्यायालयाने दोन्ही पक्षांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

TCS (PC - Wikipedia)

'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस'ला (Tata Consultancy Services -TCS) मोठा झटका बसला आहे. टीसीएसवर त्याचे एक सॉफ्टवेअर विकसित करताना स्पर्धक कंपनीचा एक सोर्स कोड चोरल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आयटी कंपनीला मोठा आर्थिक दंड सहन करावा लागू शकतो. अमेरिकेतील IT कंपनी DXC ने TCS वर आपला सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म TCS Bancs विकसित करण्यासाठी त्याचा सोर्स कोड वापरला असल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणात, यूएस ज्युरीने TCS ला DXC 210 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे 1,800 कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. (हेही वाचा - नवीन डकटेल मालवेअर Facebook Business Accounts ना करतंय लक्ष्य; घ्या जाणून)

DXC ने 2019 मध्ये या संदर्भात खटला दाखल केला होता. DXC ने केलेल्या दाव्यानुसार, TCS ने बँकिंग प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना विशिष्ट विमा प्रकरणासाठी परताव्याचा दर मोजू शकणारे सॉफ्टवेअर तयार करण्यात अडचणी येत होत्या. DXC ने खटल्यासोबत संबंधित TCS कर्मचाऱ्यांचे ईमेल तपशील देखील दिले आहेत.

टीसीएसने कंपनी ज्युरीच्या निर्णयाशी सहमत नाही. टीसीएसने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की या प्रकरणावर आता न्यायालय निर्णय घेईल. न्यायालयाने दोन्ही पक्षांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असल्याने ते या विषयावर अधिक भाष्य करणार नसल्याचे टीसीएसने म्हटले आहे.