TATA Sky युजर्ससाठी खुशखबर, आजपासून अधिक HD चॅनल्स पाहता येणार

डीटीएच सर्विस पुरवणाऱ्या Tata Sky यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सेट-टॉप बॉक्सची किंमती 100 रुपयांनी कमी केली. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्या युजर्ससाठी खुशखबर असून आजपासून अधिक HD चॅनल्स पाहण्याची संधी मिळणार आहे.

TV Channels | (Photo Credits: File)

डीटीएच सर्विस पुरवणाऱ्या Tata Sky यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सेट-टॉप बॉक्सची किंमती 100 रुपयांनी कमी केली. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्या युजर्ससाठी खुशखबर असून आजपासून अधिक HD चॅनल्स पाहण्याची संधी मिळणार आहे. सध्याच्या घडीला टाटा स्काय सर्वाधिक एचडी चॅनल्स ऑफर करणारे एकमेव डीटीएच प्रोव्हायडर आहे. त्यानंतर डिश टिव्ही, एअरटेल डिजिटल टिव्ही आणि सन डायरेक्ट यांचा क्रमांक येतो. टाटा स्काय 100 मधील 91 चॅनल्स एचडी मधून युजर्सला ऑफर करतात.

डिश टीव्ही त्यांच्या युजर्सला 70HD चॅनल्स, Sun Direct हे 75HD चॅनल्स ऑफर करतात. मात्र टाटा स्कायच्या संपूर्ण चॅनल बाबत बोलायचे झाल्यास एकूण 589 SD चॅनल्स देतात. सर्विस प्रोव्हाइडरच्या दृष्टीने पाहिल्यास बाजारात एअरटेल डिजिटस टीव्ही अव्वल स्थानी आहे. दक्षिण भारतीय नागरिकांसाठी सन डायरेक्ट सुविधा पुरवली जाते.(खुशखबर! D2H Magic Stick फक्त 399 रु. मध्ये उपलब्ध, तीन महिने मोफत सेवा; Sony LIV, Zee5, ALT Balaji पहा फ्रीमध्ये)

टाटा स्कायने अलीकडेच आपले वॉच पोर्टलही बाजारात आणले आहे. या वॉच पोर्टलवर, वापरकर्ते थेट टीव्ही तसेच टाटा स्कायच्या डीसीएचएच सेवेमध्ये ऑफर केले जाणारे चित्रपट आणि इतर कंटेंट पाहू शकतात. याशिवाय टाटा स्काय ने आणखी एक नवीन सेवा सुरू केली आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या अंतर्गत ते वापरकर्त्यांना आपल्या खात्यातील शिल्लक तसेच इन्स्टंट रिचार्ज ऑप्शन, इमर्जन्सी टॉप-अप, चॅनेल पॅक तपशील आणि रीचार्जनंतर खाते रीफ्रेश करण्यास परवानगी यांसारख्या अनेक सुविधा मिळू शकतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now