Tata Sky ने बंद केले SD बॉक्स, ग्राहकांना आता HD STB निवडण्याचे ऑप्शन

कारण कंपनीने एसडी सेट टॉप (SD Set Up Box) बॉक्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावरुन या सेट अप बॉक्सला हटवले आहे. त्यानंतर आता कंपनीचे फक्त 4 सेट अप बॉक्स असणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

टाटा स्कायच्या सेटअप बॉक्स युजर्ससाठी वाईट बातमी आहे. कारण कंपनीने एसडी सेट टॉप (SD Set Up Box) बॉक्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावरुन या सेट अप बॉक्सला हटवले आहे. त्यानंतर आता कंपनीचे फक्त 4 सेट अप बॉक्स असणार आहे. त्यानुसार Tata Sky Binge+, Tata Sky HD, Tata Sky 4K और Tata Sky+ HD यांचा समावेश आहे. कंपनीने हा निर्णय HD सेटअप बॉक्सवर सूट उपलब्ध करुन देण्यासाठी घेतला आहे. DreamDTH यांचा मते, टाटा स्कायने सेट अप बॉक्स 5 फेब्रुवारीलाच बेवसाईट्सवरुन हटवले आहेत.

मात्र सध्या सुरु असलेल्या एसडी सेट अप बॉक्स ग्राहकांसाठी ही सुविधा सुरु ठेवणार की नाही याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तसेच एसडी सेट अप बॉक्स काढून टाकल्यानंतर ग्राहकांना HD STB चा ऑप्शन उपलब्ध करुन देण्यात आला आहे.सध्याच्या घडीला टाटा स्काय सर्वाधिक एचडी चॅनल्स ऑफर करणारे एकमेव डीटीएच प्रोव्हायडर आहे. त्यानंतर डिश टिव्ही, एअरटेल डिजिटल टिव्ही आणि सन डायरेक्ट यांचा क्रमांक येतो. टाटा स्काय 100 मधील 91 चॅनल्स एचडी मधून युजर्सला ऑफर करतात.डिश टीव्ही त्यांच्या युजर्सला 70HD चॅनल्स, Sun Direct हे 75HD चॅनल्स ऑफर करतात. मात्र टाटा स्कायच्या संपूर्ण चॅनल बाबत बोलायचे झाल्यास एकूण 589 SD चॅनल्स देतात.(TATA Sky युजर्ससाठी खुशखबर, आजपासून अधिक HD चॅनल्स पाहता येणार)

टाटा स्कायने अलीकडेच आपले वॉच पोर्टलही बाजारात आणले आहे. या वॉच पोर्टलवर, वापरकर्ते थेट टीव्ही तसेच टाटा स्कायच्या डीसीएचएच सेवेमध्ये ऑफर केले जाणारे चित्रपट आणि इतर कंटेंट पाहू शकतात. याशिवाय टाटा स्काय ने आणखी एक नवीन सेवा सुरू केली आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या अंतर्गत ते वापरकर्त्यांना आपल्या खात्यातील शिल्लक तसेच इन्स्टंट रिचार्ज ऑप्शन, इमर्जन्सी टॉप-अप, चॅनेल पॅक तपशील आणि रीचार्जनंतर खाते रीफ्रेश करण्यास परवानगी यांसारख्या अनेक सुविधा मिळू शकतात.