Tata Sky सेट टॉप बॉक्स झाला स्वस्त, Amazon Prime चे मिळणार फ्री सब्सक्रिप्शन आणि अन्य काही फिचर्स

TV Channels | (Photo Credits: File)

देशभरात वेगाने वाढणारे ओटीटी कंन्टेंट आणि स्मार्ट टिव्हीची मागणी पाहता Tata Sky ने त्यांच्या सेटअप बॉक्स Tata Sky Binge+ च्या किंमतीत 1 हजार रुपयांची घट केली आहे. त्याचसोबत या सेटअप बॉक्सची किंमत 1 हजार रुपयांनी कमी केली आहे. हा एक अॅन्ड्रॉइड सेटअप बॉक्स असून तो अॅन्ड्रॉइड Pie 9.0 सपोर्टसह येणार आहे. त्याचसोबत मिळणाऱ्या रिमोट मध्ये गूगल असिस्टंट सपोर्ट ही दिला आहे.(खुशखबर! Tata Sky आपल्या ग्राहकांच्या बिलाचे दर करणार कमी, आपल्या यूजर्सला परत मिळविण्याचा कंपनीचा नवा फंडा)

ऑफर अंतर्गत ग्राहकांना फ्री मध्ये Tata Sky Binge+ चे सब्सक्रिप्शन दिले जाणार आहे. या सब्सक्रिप्शनमध्ये Disney+, Hotstar, Sun NXT, Hungama Play, Shemaroo आणि Eros Now सारखे ओटीटी अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा मिळणार आहे. त्याचसोबत कंपनीकडून 3 महिन्यांसाठी Amazon चे सब्सक्रिप्शन दिले जाणार आहे.(Tata Sky ब्रॉडबॅन्डने लॉन्च केला 300Mbps स्पीड आणि 500GB डेटा असणारा धमाकेदार प्लॅन, जाणून घ्या अधिक)

जर तुम्हाला Tata Sky Binge+ सेट टॉप बॉक्स खरेदी करायचा असल्यास त्यासाठी तुम्हाला 2,999 रुपये द्यावे लागणार आहेत. यापूर्वी सेट अप बॉक्सची किंमत 3,999 रुपये होते. मात्र आता 1 हजार रुपयांनी किंमत कमी केली आहे. त्याचसोबत Tata Sky Bing+ सेट अप बॉक्सवर 6 महिन्यांसाठी टाटा स्काय बिंज सब्सक्रिप्शन आणि तीन महिन्याचे Amazon Prime सब्सक्रिप्शन फ्री मध्ये मिळणार आहे. ऐवढेच नाही तर Tata Sky Binge+ च्या मल्टी टीव्ही कनेक्शनची किंमत 1500 रुपये कमी करत 2499 रुपये केली आहे. ग्राहकांना नव्या किंमतीत Tata Sky Bing+ बॉक्स कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन खरेदी करता येणार आहे.

तर गेल्या काही महिन्यांपूर्वीच टाटा स्कायने  आपले वॉच पोर्टलही बाजारात आणले आहे. या वॉच पोर्टलवर, वापरकर्ते थेट टीव्ही तसेच टाटा स्कायच्या डीसीएचएच सेवेमध्ये ऑफर केले जाणारे चित्रपट आणि इतर कंटेंट पाहू शकतात. याशिवाय टाटा स्काय ने आणखी एक नवीन सेवा सुरू केली आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या अंतर्गत ते वापरकर्त्यांना आपल्या खात्यातील शिल्लक तसेच इन्स्टंट रिचार्ज ऑप्शन, इमर्जन्सी टॉप-अप, चॅनेल पॅक तपशील आणि रीचार्जनंतर खाते रीफ्रेश करण्यास परवानगी यांसारख्या अनेक सुविधा मिळू शकतात.