Tata Sky च्या SD, HD सेट-अप बॉक्सच्या किंमतीत वाढ

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) यांनी National Tariff Order 2.0 लागू केले आहे. त्यानंतर टाटा स्कायने (Tata Sky) त्यांच्या SD आणि HD सेट-अप बॉक्सच्या किंमतीत वाढ केली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने या STB च्या किंमती 1399 रुपये केले होते. SD STB च्या किंमती पहिल्यापासूनच 1399 रुपये होते.

TV Cable Charges (Photo Credits: Twitter)

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) यांनी National Tariff Order 2.0 लागू केले आहे. त्यानंतर टाटा स्कायने (Tata Sky) त्यांच्या SD आणि HD सेट-अप बॉक्सच्या किंमतीत वाढ केली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने या STB च्या किंमती 1399 रुपये केले होते. SD STB च्या किंमती पहिल्यापासूनच 1399 रुपये होते. परंतु HD STB च्या किंमती 100 रुपयांनी कमी केल्या असून 1399 रुपये केले होते. मात्र आता NTO 2.0 लागू झाल्यानंतर सध्या STBs च्या किंमती 1499 रुपये झाल्या आहेत. या किंमती कंपनीच्या वेबसाईट्सवर झळकावल्या आहेत.यापूर्वी कंपनीने SD आणि HD STBs साठी 1399 रुपये ठेवले होते. मात्र आता याचा किंमती 100 रुपयांनी वाढवल्याने 1499 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तसेच टाटास्कायने प्रायमरी कनेक्शनच्या किंमतीसह मल्टी टीव्ही कनेक्शच्या किंमती सुद्धा वाढवल्या आहेत. याआधी SD STB च्या सेकेंडरी कनेक्शनच्या किंमती 1299 रुपयांवरुन 1399 रुपये केले आहे. तर HD सेकेंडरी कनेक्शनच्या किंमती 1199 रुपये झाल्या आहेत.

जर टाटास्कायच्या STBs च्या किंमती Airtel Digital Tv सोबत तुलना केल्यास तर Airtel च्या HD STB च्या किंमती 1300 रुपये आहे. तर SD STB च्या किंमती 1100 रुपये आहे. टाटास्कायच्या SD कनेक्शनच्या किंमती Airtel पेक्षा 399 रुपयांनीअधिक आहेत. ऐवढेच नाही तर HD STBs च्या किंमती एअरटेलपेक्षा 199 रुपये अधिक आहेत. दरम्यान, यामध्ये इंजिनिअरच्या किंमती वेगळ्या स्वरुपात स्विकारल्या जातात. त्यामुळे आता टाटास्कायच्या ग्राहकांच्या शिखाला कात्री बसणार आहे.(TATA Sky युजर्ससाठी खुशखबर, अधिक HD चॅनल्स पाहता येणार)

काही दिवसांपूर्वीच टाटा स्कायच्या सेटअप बॉक्स युजर्ससाठी वाईट बातमी आहे. कारण कंपनीने एसडी सेट टॉप बॉक्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावरुन या सेट अप बॉक्सला हटवले आहे. त्यानंतर आता कंपनीचे फक्त 4 सेट अप बॉक्स असणार आहे. त्यानुसार Tata Sky Binge+, Tata Sky HD, Tata Sky 4K और Tata Sky+ HD यांचा समावेश आहे. कंपनीने हा निर्णय HD सेटअप बॉक्सवर सूट उपलब्ध करुन देण्यासाठी घेतला आहे. DreamDTH यांचा मते, टाटा स्कायने सेट अप बॉक्स 5 फेब्रुवारीलाच बेवसाईट्सवरुन हटवले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now