Google Pay वापरत आहात मग फ्रॉड टाळण्यासाठी 'ही' अॅप्स वापरणं टाळण्याचा गूगलचा सल्ला
त्यामुळे ही अॅप्स वापरण्याचे टाळण्याचा सल्ला दिला जातो.
तंत्रज्ञान जसं प्रगत झालं तसे त्या माध्यमातून होणारे फ्रॉड्स देखील वाढले आहेत. आजकाल अनेक जण आर्थिक व्यवहार हे ऑनलाईन पेमेंट मोड द्वारा करतात. मात्र आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आता गूगल पे कडून विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. व्यवहार करताना स्क्रिन शेअरिंग अॅप (Screen Sharing App) वापरणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गूगल पे (Google Pay) कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार फ्रॉड करणारी मंडळी advanced Artificial Intelligence आणि fraud prevention technology चा वापर करत आहेत. काही वेळेस लक्ष भरकटवून देखील आर्थिक गंडा घातला जाऊ शकतो त्यामुळे अधिक सतर्क राहून व्यवहार करण्याचे आवाहन केले जाते.
गूगल पे कडून 2 स्तरांवर सुरक्षा राखली जाते. त्यापैकी एक म्हणजे unlocking the application आणि UPI PIN द्वारा व्यवहार. पहिल्या स्टेप मध्ये पेमेंट अॅप्लिकेशन सुरक्षित असल्याचं पाहिलं जातं त्यानंतर यूपीआय पिनचा वापर केला जातो. हा पिन एटीम पिन प्रमाणे सुरक्षित आणि गुप्त असतो. या सुरक्षेच्या भिंती भेदूनही काही फ्रॉड केले जाऊ शकतात.
सुरक्षित व्यवहारांसाठी गूगल पे कडून काही नियमावली देण्यात आली आहे. यामध्ये खाजगी माहिती सुरक्षित ठेवली जाते. गूगल पे अकाऊंट मध्ये आल्यानंतर ओटीपी खाजगी ठेवला जातो. फोनवर कोणत्याही दबावाखाली किंवा लक्ष नसताना व्यवहार न करण्याचा आणि सोशल नेटवर्किंग साइट वर माहिती न देण्यचाही सल्ला दिला जातो.
सुरक्षित व्यवहारांसाठी गूगल पे कडून स्क्रिन शेअरिंग अॅप न वापरण्याचा सल्ला दिला जातो. व्यवहार करताना ते मूळीच वापरू नका. या अॅप मुळे युजर आपोआपच डिव्हाईज स्क्रिन शेअर केली असल्याने रिअल टाईम मध्ये ती दुसर्यांना दिसू शकते. यामधून सारीच अॅक्टिव्हीटी उघडपणे होते. स्क्रिन शेअरिंग अॅपचा वापर एखादी अडचण सोडवण्यासाठी, एकत्र काम करण्यासाठी नक्कीच होऊ शकतो पण आर्थिक व्यवहारांच्या वेळेस त्यांना लांब ठेवावे.